आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या घोडदौडीला कर्नाटकात थांबां; 220 मठांचे काँग्रेसला समर्थन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- देशातील अनेक राज्यांमधील निवडणुकांमध्ये सातत विजय संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कर्नाटक निवडणूक मात्र अवघड जाणार असे दिसत आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिल्याने कर्नाटकातील माठाधिपतींनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या भूमिकेला विरोध करत शनिवारी कर्नाटकातील तब्बल 220 मठांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.


सध्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म देण्याची मागणीने जोर धरला आहे. भाजपच्या भूमिकेला विरोध करत शनिवारी 220 मठांच्या मठाधिपतींनी बैठक घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली. यामुळे आता भाजप समोरील अडचणीत वाढ झाली आहे. लिंगायत समाजाने कॉग्रेसला पाठिंबा दिल्यास भाजपच्या विजयात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, कर्नाटकातील लिंगायत समाजातील वीरशैव समाज हा काँग्रेसच्या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे.

बातम्या आणखी आहेत...