आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dangerous Drugs ड्रग्जसाठी पैसे घेऊन जा पण एकदा उठ..मृत मुलासमोर आईने फोडला टाहो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - पंजाबमध्ये ड्रग्जने आणखी एक बळी घेतला आहे. पिम्सच्या नशा मुक्ती नुकताच 25 वर्षांचा तरुण रिक्की उर्फ लाडी याचा मृत्यू झाला. तो खूप दिवसांपासून नशेच्या आहारी गेलेला होता, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. दीड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीने सांगितले की, शेवटच्या क्षणीदेखिल तो नशा करण्यासाठी पैसे मागत होता. अंत्य संस्काराच्या वेळी तर त्याच्या आईने टाहोच फोडला. हवे तर ड्रग्जसाठी माझ्याकडून पैसे घेऊन जा पण एकदा उठ.. अशा शब्दांत तीने भावना व्यक्त केल्या. मृताचे वडीलही धक्क्यात असल्याचे सांगितले जात आहे. 

 

पत्नी म्हणाली.. तर वाचला असता 
पत्नी अमन म्हणाली की, तिचा पती कुटुंबीयांकडून ड्रग्जसाठी पैसे मागायचा. पैसे मिळाले नाही तर त्याला प्रचंड राग यायचा. अखेरच्या क्षणी जेव्हा माझे त्याच्याशी बोलणे झाले होते, तेव्हा तो म्हणाला होता, ड्रग्ज मिळाले नाही तर तो मरून जाईल. खरंच झालेही तसेच. त्याची अवस्था पाहून मलाही वाटले की, कदाचित त्याला ड्रग्ज मिळाले असते तर तो जीवंत तरी राहिला असता. अखेरच्या क्षणापर्यंत तो मला पैसे मागत राहिला. त्याला वाचवू शकले नाही, याचे मला दुःख आहे. 


नातेवाईक म्हणाले, नोकरीपेक्षा ड्रग्ज मिळणे सोपे आहे 
- मृताची आजी आणि इतर नातेवाईक म्हणाले, आमच्या मुलांना ड्रग्ज तर सहजपणे मिळतो पण नोकरी लवकर मिळत नाही. लाडी हा हुशार होता, पण सर्व हुशारी वाया गेली. ड्रग्ज विकणारे सगळीकडे आहेत. पण पोलिसांना ते का दिसत नाहीत. 


यामुळे झाला मृत्यू 
दवाखान्यातील एका वरिष्ठ कर्मचाऱअयाने सांगितले की, रिक्कीला सेल्यूलाइटस झालेले होते. हा आजार वारंवार शरिरातील नस पंक्चर केल्यामुळेही होत असतो. वारंवार नसांमध्ये इंजेक्शनने छिद्र केल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते. 


मार्च-जूनमध्ये 3000 जणांवर उपचार 
जिल्ह्यातील दोन नशा मुक्ती केंद्रात 4 महिन्यांत जवळपास 3 हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. तर 4 महिन्यांत जालंधरच्या रुग्णालयात जवळपास 572 रुग्णांची उपचार घेतले. 

 

बातम्या आणखी आहेत...