आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्यांच्या बालिकेला तप्त लोखंडी सळईने डागले, ती ओरडत असताना आईवडील बघत राहिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलवाडा (राजस्थान) - विज्ञानाने खूप प्रगती केली, आपण 21व्या शतकात राहतो, असे नेहमी म्हटले जाते. पण एवढी प्रगती, पुढारलेपणा अज्ञान अन् अंधश्रद्धेपुढे कुचकामी ठरतो. कुठलाही आजार झाला काही अंगारेधुपारे करायचे अन् आपल्या हातानेच जिवावर बेतणारे संकट ओढवून घ्यायचे, ही गावोगावी पसरलेली कुप्रथा. अशीच एक घटना भिलवाडाजवळील रामा खेडा गावात घडली. या गावात 4 महिन्यांच्या बालिकेला न्यूमोनिया झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी तिच्या आजोबांनी अघोरी उपचार केले.

> आजोबाने त्या चिमुकलीच्या पोटावर गरम तारेने चटके देऊन खुणा केल्या. विशेष म्हणजे आईवडिलांसमोरच चटका बसत असताना ते अबोध बाळ जोरजोरात रडत होते, पण त्यांनी काहीही केले नाही. चटका बसल्यामुळे बाळाची तब्येत सुधारण्याऐवजी आणखी बिघडतच गेली. बाळाला श्वास घेताना अडचण होऊ लागली तेव्हा रविवारी रात्री उशिरा आईवडील त्याला घेऊन एमजी रुग्णालयात गेले आणि त्याला चिल्ड्रन वॉर्डमध्ये अॅडमिट केले. इकडे माहिती मिळाल्याने कारोई पुलिस व बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. सुमन त्रिवेदी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बालिकेचे आईवडील जबाब बदलत राहिले, परंतु आजोबाने स्वत:च बाळाला चटका दिल्याचे कबूल केले.

 

असे आहे प्रकरण...
- उदयलाल भील यांच्या 4 महिन्यांची मुलगी नंदिनीला न्यूमोनिया व खोकला झाला होता.
- खूप दिवस झाले तरी खोकला थांबत नव्हता, तेव्हा आजोबा भगवानलाल भिल हे 16 मार्च रोजी आई सीताकडून नंदिनीला घेऊन गेले. 
- त्यांनी बाळाच्या पोटावर तार गरम करून त्याने निशाण बनवला.
- निशान लावल्याने बाळाची तब्येत आणखीनच बिघडली, तेव्हा रविवारी रात्री तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले.

 

गरम सळईने लावला निशाण
- वडील उदयलाल म्हणाले की, मुलीचा खोकला खूप दिवस झाले तरी थांबत नव्हता.
- तिला ‘बावजी’कडे घेऊन गेलो होतो. तेथे सांगण्यात आले की, तिला गरम चटक्याने खूण करा मग ठीक होईल.
- चटका देणाऱ्यांबाबत म्हणाले की, घरी आलेले कारागीर तिला चटका देण्यासाठी घेऊन गेले, त्यांनी कुठे नेले होते माहिती नाही.
- दुसरीकडे बाळाची आई सीता म्हणाली की, आम्हाला मुलीला खूण करायची आहे म्हणून घेऊन गेले.

 

चटका देऊन अघोरी उपचार केल्याने झाला आहे 2 मुलांचा मृत्यू
-डॉ. सुमन त्रिवेदी, बाल कल्याण समिती अध्यक्ष म्हणाले, आजोबा भगवानलालनेच बालिकेला गरम तारेने डागले आहे. दोन वर्षांत डाग दिल्याने 14 बालकांची तब्येत बिघडल्याचे आढळले आहे. यात एक मुलाचा व एका मुलीचा मृत्यूही झालेला आहे. डॉक्टर म्हणाले की, नंदिनीला हृदय व फुप्फुसाचा त्रास आहे. तिला श्वास घेताना अडथळा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...