आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅग ठेवून बाप पुटपुटत होता मंत्र, चमत्कारासाठी घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालोदा बाजार - येथे 4 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह एका बॅगमध्ये आढळला. मृत मुलीचे काका म्हणाले की, त्यांच्या भावानेच जादूटोण्याच्या नादी लागून आपल्या मुलीचा बळी दिला. दुसरीकडे, पकडले गेल्यानंतर आरोपी बापाने कबूल केले की, काळ्या जादूच्या नादी लागून हे सर्व केले आहे. बुधवारी सकाळी त्याने पुन्हा आपला जबाब फिरवला आणि विक्षिप्त चाळे करायला लागला. पोलिस पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना छाडिया गावातील आहे. येथे मंगळवारी संध्याकाळी 4 वर्षीय बालिकेचा मृतदेह तिचे काका विमल देवांगन यांनी एका बॅगमध्ये पाहिला.
- त्यांनी लगेच खरोरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विमलने सांगितले की, त्यांचा भाऊ जादूटोण्याच्या नादी लागला आहे.
- त्यानेच मुलीची हत्या करून डेडबॉडी बॅगमध्ये ठेवून कुठेतरी जात होता. जादूटोण्याच्या या प्रकारात आणखी 3-4 जण सामील आहेत.
- आरोपी आणखी 2-3 जणांना जिवे मारणार आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा बॅगमध्ये ठेवलेल्या मृतदेहाजवळ बसून काही मंत्रांचा तो जप करू लागला.
- अगोदर त्याने हे सर्व कबूल केले, पण बुधवारी सकाळी त्याने जबाब फिरवला. म्हणू लागला- माझ्या मुलीला कोणी मारले, माहिती नाही.
- तो विक्षिप्तांसारखे चाळे करू लागला. पोलिसांच्या मते, आरोपी पिता दीपचंद देवांगन (36) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध याआधीही गुन्ह्यांची नोंद आहे. 
- कमी कालावधीत अमाप पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हा बळी दिला असेल. तथापि, अजूनही पोलिसांची चौकशी सुरू आहे.
- पोलिस पीएम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. यानंतरच प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...