आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड : खपरी महुआजवळ नक्षलींनी घडवला भूसुरुंग स्फोट, 6 जवान शहीद 5 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातेहार- झारखंड राज्यातील लातेहार भागात मंगळवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद आणि ५ जखमी झाले. 


झारखंड जग्वारच्या ११२ बटालियन व असॉल्ट ग्रुपचे ४० सदस्य मोहीम संपवून जात असताना नक्षलींनी बूढापहाड भागात आयईडी स्फोट घडवला. खपरी महुआजवळ नक्षलींनी भूसुरुंगाचा स्फोट केला. यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलींनी शहीद जवानांची शस्त्रेही लुटून नेली. भाकप माओवादी संघटनेचा सदस्य विश्वनाथ ऊर्फ संतोषने स्फोटकांनीशी या भागाला वेढा घातला होता. 

बातम्या आणखी आहेत...