आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरीतील चिमुकली म्हणाली, शिक्षकाने लाड केले; पोटदुखीनंतर झाला Shocking खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा - पंजाबच्या एका ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिक्षकाने 6 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पतियाळा जिल्ह्यातील सानौर गावात असलेल्या सरकारी शाळेत हा प्रकार घडला. अवघ्या दुसरीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या आईला पोटाखाली खूप दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर आईने सविस्तर विचारले असता त्या निष्पाप मुलीने केलेल्या वर्णनावर आई आणि बाबांचे अश्रू निघाले. दुसऱ्या वर्गात कुणीच नसताना शिक्षकाने कपडे काढेल आणि लाड केले असे ती म्हणाली. 


कुटुंबियांनी सरपंचांना दिली माहिती
आई-वडिलांनी हा प्रकार वेळीच लक्षात घेत गावात सरपंचांकडे तक्रार केली. सरपंच गावातील इतर लोकांना शाळेत पोहोचले, तेव्हा 38 वर्षीय नराधम शिक्षक सतिश बाथरुममध्ये जाऊन लपला. मात्र, गावकऱ्यांनी त्याला शोधून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. ही घटना 6 जुलै रोजीच घडली होती. त्याचवेळी पालकांना शाळेत तक्रार दाखल केली होती. परंतु, त्या तक्रारीची 11 दिवस दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे, बुधवारी पालकांनी पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 354, 12 पोक्सो अॅक्ट अंतर्गत खटला दाखल केला. 


यापूर्वी 5 वीच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न
शाळेत 3 खोल्या आहेत. एका खोलीत कार्यालय आहे. दोन खोल्यांमध्येच 5 वर्ग लागतात. घटनेच्या वेळी शाळेचे हेड मास्तर दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी आरोपी सतीश सर्वच मुला-मुलींना एका खोलीत शिकवत होता. त्याने दुसरी खोली रिकामी ठेवली होती. घटनेच्या वेळी त्याने आपल्या रिकाम्या खोलीत कुणीही येऊ नये यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांना संगणक वर्गात व्यस्त केले होते. हेड मास्तरांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, यापूर्वीही सतिशने एका 5 वीच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुद्धा हेडमास्तर डेप्युटेशनवर दुसऱ्या शाळेत गेले होते.

बातम्या आणखी आहेत...