आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

72 वर्षीय वडिलांना 7 दिवस ठेवले उपाशी, मारहाण करून घराबाहेर काढले, कपडेही रस्त्यावर फेकूले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक

पानिपत (हरियाणा) - येथील एका 72 वर्षीय म्हाताऱ्याने पोलिस अधीक्षकांकडे मुलाची तक्रार केली. वडिलांनी आरोप केला की, मुलाने त्यांना 7 दिवस जेवायला दिले नव्हते. तसेच गुरुवारी सायंकाळी मला मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. एवढेच नाही तर, त्याने कपडेही रस्त्यावर फेकून दिले असेही म्हाताऱ्याने तक्रारीत सांगितले. 

 

पोलिस अधीक्षकांकडे घेतली धाव
- मुलाने घराबाहेर काढल्यानंतर पित्याने कशीतरी रात्र रस्त्यावर काढली. सकाळ होताच ते पोलिस अधीक्षक मनबीर सिंग यांच्याकडे गेले. डीएसपी हेडक्वार्टर जगदीप दूहन यांना भेटल्यानंतर म्हातारा रडू लागला. रडत रडत मुलाने कशाप्रकारे टॉर्चर केले हे त्यांनी सांगितले. 
- त्यांनी सांगितले की, घर अजूनही त्यांच्या नावावर आहे. जर मुलगा म्हातारपणी खाऊ घालू शकत नसेल तर त्याला त्याच्या घरात राहण्याचाही अधिकार नाही. घरावर ताबा मिळवून द्यावा असे ते पोलिसांना म्हणाले. डीएसपींनी पोलिसांना ज्या आजोबांबरोबर पाठवले. पोलिसांनी बोलावल्यानंतर मुलगा पोलिस चौकीत आला आणि माफी मागून पित्याला बरोबर नेले. पोलिसांनी मुलाला पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा दिला आहे. 


मुलगा करतो शिविगाळ 
- आजोबाने सांगितले की, त्यांचा मुलगा मेहुण्याबरोबर दारु पितो. त्याला अडवणूक केली तर घाणेरडी शिविगाळ करतो. 7 दिवसांपासून त्याने जेवायला दिले नाही. त्यामुळे आजोबांनी लोकांकडून मागून जोवण केले. गुरुवारी सायंकाळी मुलाने वडिलांना मारून बाहेर काढले. परत आले तर मारून टाकू अले म्हणाले. वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना आता याठिकाणी राहायचे नाही. घर विकून गावी जाण्याची त्यांची इच्छा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...