आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75चा नवरदेव अन् 60ची नवरी, 47 वर्षांपासून होते प्रेम; अशी होती लव्ह स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या सोनपूरमध्ये एका 75 वर्षीय बुजुर्गाने 60 वर्षीय महिलेशी लग्न केले. त्यांनी मंदिरात जाऊन फेरे घेतले आणि देवाच्या साक्षीने एकमेकांना हार घालून पूर्ण रीतिरिवाजाने लग्न केले. दोघेही खूप वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- 75 वर्षीय बुजुर्गाचे नाव वैद्यनाथ प्रसाद सिंह आहे आणि महिलेचे नाव सुगम संघा असे आहे.
- वैद्यनाथ हे ब्लॉक कर्मचारी आहेत आणि ते खूप वर्षांपूर्वी सुगम यांच्या घरी किरायाने राहत होते.
- त्या वेळी विवाहित असल्याने वैधनाथ यांनी सुगम यांना आपल्या मनातील गोष्ट सांगितली नव्हती, परंतु आता लग्न करून त्यांनी आपले प्रेम मिळवले.
- तथापि, दोघेही 1971 म्हणजेच 47 वर्षांपासून एकमेकांपासून पसंत करत होते.

 

अशी सुरू झाली लव्ह-स्टोरी
-1971 मध्ये वैधनाथ सुगम यांच्या घरी राहायला गेले होते, तेव्हापासूनच त्यांनी मनाने सुगम यांना पत्नी मानले होते.
- वैधनाथ यांनी सुगमच्या नावे खूप प्रॉपर्टी खरेदी केली होती, परंतु कुटुंबामुळे कुणालाही सांगितले नाही. 
- सुगम यांनी वैधनाथ यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांच्या घराची खूप काळजी घेतली होती.
- परंतु आजारपणातच वैद्यनाथ यांच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर सुगम यांनीच त्यांचे कुटुंब आणि मुलांना सांभाळले.
- यानंतर मुलांनीच आपले वडील आणि सुगम यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...