आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृतदेह पाहून आईने असा केला आक्रोश...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 वर्षांच्या बालिकेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. - Divya Marathi
8 वर्षांच्या बालिकेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कन्नौज - येथील तिरवा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. येथे एका 8 वर्षीय बालिकेचे आधी अपहरण करण्यात आले आणि नंतर गँगरेप करून तिचा मृतदेह एका पोत्या टाकून शेतात फेकून देण्यात आला. या पाशवी अत्याचाराची माहिती कळताच अख्ख्या गावात खळबळ उडाली.  

 

घराजवळूनच नेले उचलून...
तिरवा परिसरातील कमलेपूर्वा गावाचे राहणारे मान सिंह यांची 8 वर्षीय मुलगी सोमवारी आपल्या घराजवळच्या दुकानावर काही सामान घ्यायला गेली होती, तेवढ्यात काही जणांनी तिचे अपहरण केले. यानंतर आरोपींनी चिमुकलीवर गँगरेप केला आणि तिची हत्या करून तिचा मृतदेह एका पोत्यात भरून गावातीलच एका शेतात फेकून दिला.

 

जवळ जाऊन पाहिल्यावर बसला धक्का... 
जेव्हा गावकऱ्यांनी शेतात पोते पाहिले तेव्हा त्यांना संशय आला, जवळ जाऊन पाहिल्यावर सर्वांना धक्काच बसला. पोत्यात चिमुरडीचा मृतदेह होता. हे वृत्त पसरताच गावात खळबळ उडाली. घटनास्थळी चिमुरडीच्या कुटुंबीयांसहित गावकऱ्यांची धाव घेतली.

 

आरोपीचा असा लागला शोध...
यानंतर लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी फोरेंसिक टीमसोबत पोहोचलेल्या पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिस चौकशीत लोकांनी सांगितले की, त्यांना गावातीलच एक तरुण- कादिरवर संशय आहे, कारण घटनेच्या वेळी त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहण्यात आले होते. जेव्हा लोकांनी त्याला याचे कारण विचारले तेव्हा तो शिवीगाळ करायला लागला. 

 

घरातून मिळाले रक्ताने माखलेले कपडे...
जेव्हा पोलिसांनी लोकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आरोपी कादिरच्या घरी छापा टाकला, तेव्हा आरोपी आढळला नाही. परंतु त्याच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे मिळाले आहेत. पोलिसांना तेथे दोन जणांचे कपडे मिळाले, यावरूनच ही घटना घडवण्यात दोन जणांचा हात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

 

एसपी म्हणाले- लवकरच होईल आरोपींना अटक
एसपी हरीशचंद्र म्हणाले की, 8 वर्षीय बालिकेची पाशवी गँगरेपनंतर हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. याप्रकरणी निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या अमानुष घटनेशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...