आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91 वे अखिल भारतीय साहित्‍य संमेलन; कुठे नेऊन ठेवलाय कविसंमेलनाचा गाडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजी गायकवाड संमेलननगरी, बडाेदे - कुठे नेऊन ठेवलाय कविसंमेलनाचा गाडा  

ना शब्दांचे भान अाम्हाला  
फुकटचा मांडव छान अाम्हाला  
कविता म्हणजे असतं काय  
खाली डाेकं वर पाय  
एक टाळी, दाेन टाळ्या  
कधी उन्हं कधी पहाळ्या  
कवी येताे, कवी जाताे,   
काय माहिती याला काेण निवडताे  
कवितेचं सिलेक्शन काेण करताे  
रडत नाही घालता राडा  
कुठे नेऊन ठेवलाय कविसंमेलनाचा गाडा  
एखादाच गितेश शिंदे हरवलेल्या माणसाला विचारताे  
हरवला-हरवली अाहेची पत्रकं  
दिसतात रेल्वेस्टेशनवर डकवलेली  
नारायण डहाळे म्हणून जातात  
पाॅवर अाॅफ झाली, नेट-टीव्ही बंद झाला की अानंद हाेताे  
या वेळी मला बाेलता येतं माझ्या मुलांशी  
पुढे यथातथाच येते एखादी हतबल कविता  
सुजाता पाटील म्हणते माझी नसते २४ तास कविता  
गाैरी लंकेशला अाठवण कवी मंगेश म्हणतात   
तू अशी झाेपू नकाे कपाटात पहुडलेल्या पुस्तकांवर  
मला भास हाेताे पुस्तकांच्या ज्वाळा झाल्याचा  
सराेज धारापुरीकर रामराज्यासाठी कृष्ण घ्या म्हणतात…    मग मुद्दामच पडताे टाळ्यांचा सडा  
कुठे नेऊन ठेवलाय कविसंमेलनाचा गाडा...  

बातम्या आणखी आहेत...