आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revenge नागाच्या 65 पिलांना दांड्याने ठेचून ठेचून मारले, नंतर कोबराने घेतला त्यांचा बदला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारतच्या मोतिहारी जिल्ह्याच्या भतनहिया गावातील एका घरातून नागाची 65 पिले निघाली. नागाची एवढी पिले पाहून कुटुंबातील लोक घाबरून गेले. त्याचवेळी घरातील प्रमुख दांडा घेऊन त्या पिलांना मारू लागला. त्यांनी काही वेळातच नागाच्या सर्व 65 पिलांना ठार केले. पण त्यानंतर जे झाले, ते खरंच धडकी भरवणारे होते. 


नागाने घेतला बदला 
- रिपोर्टनुसार 65 पिलांच्या मृत्यूनंतर बिळातून नाग फुत्करतच बाहेर आला. हा भला मोठा कोब्रा पाहून सगळेच घाबरले. लोक त्याला भिऊन पळायला लागले. 
- काही वेळासाठी पिलांना मारणाता तो व्यक्तीही घाबरला होता. पण नंतर त्यानं दांड्याने कोब्राला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने दांड्याचा हल्ला करताच सापाने लगेच उसळी घेत त्याला चावा घेतला. 
- पण तोपर्यंत गावातील इतर लोक त्याठिकाणी लाकडे घेऊन आले होते. ते सर्वच नागावर हल्ला करू लागले. थोड्याच वेळात सापानेही जीव सोडला त्यानंतर साप चावलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. 
- हा नाग यापूर्वीही तीन लोकांना चावला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील लोक प्रचंड घाबरलेले होते. 

बातम्या आणखी आहेत...