आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fed Up Of Wife And In Laws Black Magic Rituals Man Commits Suicide, Videos Found

Suicide Video: पत्नी-सासूच्या जादू-टोण्याला कंटाळून रेल्वेसमोर घेतली उडी, पोलिसांना सापडले 2 व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील लूणी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मरण्यापूर्वी त्याने आपल्या भावना व्यक्त करताना एक सुसाइड नोट आणि दोन सुसाइड व्हिडिओ तयार केले होते. आपल्या पत्नी आणि सासूच्या काळ्या जादूच्या विधींना तो कंटाळला होता. सोबतच, घरात होणारी भांडणे टोकाला पोहोचली होती असेही त्याने मांडले. पोलिसांना त्याचे दोन सुसाइड व्हिडिओ आणि एक नोट सोशल मीडियावर सापडली आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह सरोज या तरुणीशी झाला होता. 


काय आहे प्रकरण?
- गेल्या 2 महिन्यांपासून पत्नी आणि सासूकडून काळ्या जादूच्या विधी सुरू होत्या. त्याच तांत्रिक विधीला तो कंटाळला होता. आपल्या वेदना त्याने दोन व्हिडिओमध्ये व्यक्त केल्या आहेत. तसेच एका पानाचे पत्र लिहून ट्रेनसमोर उडी मारली. 
- पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या कुटुंबियांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर युवकाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास दोन व्हिडिओ आणि एक पत्र सापडले. जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लूणी आउटर सिग्नल परिसरात जोधपूर ते बाडमेरला जाणाऱ्या मालाणी एक्सप्रेसखाली त्याचे तुकडे झाले होते. त्याचे नाव मुकेश चौहान (23) असे आहे. घटनास्थळावरून त्याचा मोबाईल सुद्धा सापडला. परंतु, तो लॉक आहे. तज्ञांकडून तो लॉक काढून आणखी तपास केला जात आहे. 

 

पहिल्या व्हिडिओनंतर कुटुंबियांनी वाचवले...
- पहिला व्हिडिओ 4 मिनिटे 20 सेकंदांचा आहे. दुसरा व्हिडिओ 41 सेकंदांचा आहे. मुकेशने हे व्हिडिओ रेल्वे ट्रॅकवर बसूनच बनवले आहेत. 
- व्हिडिओमध्ये तो पत्नी सरोजला म्हणतो, "माझे आई-वडील खूप चांगले आहेत. सगळेच चांगले आहेत. परंतु, पत्नीकडून दुखी असल्याने मी आत्महत्या करत आहे. आज 5 तारीख आहे... माझ्या आयुष्यात आता काहीच उरले नाही... सरोज तुला प्रेम असेल, माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर आपण पुन्हा भेटू..."


पत्नीच्या फोटोला किस करून म्हणाला मी जातोय...
- पहिला व्हिडिओ 5 जुलैचा आहे. त्याने हा व्हिडिओ बनवल्यानंतर कुटुंबियांनी त्याला रोखले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्याने पुन्हा व्हिडिओ बनवला आणि म्हणाला, "मी खूप दुखी आहे. माझ्या आई-वडिलांचा किंवा भाऊ-बहिणींचा यात काहीच दोष नाही. दोषी माझी सासू सोमा आणि पत्नी आहेत. तेच मला मांत्रिकाकडे घेऊन जातात. मी आतून खचलोय... सरोज... माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी देवापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तरीही तू मला दगा दिलंस... तुला भोंदू बाबांवर विश्वास होता, परंतु माझ्यावर नाही."
- तू दोन महिने माझ्यासोबत राहिलेस तरी मला समजू शकली नाही. लोक एका दिवसात एकमेकांना ओळखतात. तुझे आणि माझे प्रेम तर 5 वर्षांचे आहे. तरीही तू मला समजू शकली नाहीस. शरीर पैश्यांनीही मिळेल. परंतु, माझ्यासारखा प्रेम करणारा तुला जगात दुसरा सापडणार नाही. मी तुला दोनदा संधी दिली. तरीही तुझ्यामुळे माझे आई-वडील दुखावले. यानंतर त्याने आपल्या पर्समधून पत्नीचा फोटो काढला. त्याला किस करून आय लव्ह यू म्हणाला आणि आयुष्य संपवले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...