आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धांगवायूने गलितगात्र आईला मरायचा, गळा दाबत होता मुलगा; व्हिडिओमध्ये दिसले लाजीरवाने दृष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृद्ध आईला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायलर झाला आहे. - Divya Marathi
वृद्ध आईला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायलर झाला आहे.

ज्या आईने मुलाला लहानाचा मोठा केला, त्याच मुलाने अर्धांगवायू झालेल्या 82 वर्षांच्या आईला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा आईचा गळा दाबतानाही दिसत आहे. 

 

काय आहे प्रकरण 
- राजस्थानमधील शाहजहांपूर येथील ही घटना आहे. वृद्ध महिलेला मारहाण करत असलेला तिचा स्वतःचा मुलगा आहे. 
- आरोपीचे नाव जोगेंद्र चौधरी आहे. राजस्थानमधील जाट बहरोड गावातील हा व्हिडिओ आहे. 
- व्हिडिओमध्ये जोगेंद्र त्याच्या 82 वर्षांची आई ब्रहाम्कौर देवीला मारहाण करताना दिसतो. वृद्ध महिलेला सहा वर्षांपासून अर्धांगवायू होता. त्यांचा 18 जानेवारीला मृत्यू झाला आहे. 
- हा व्हिडिओ जुना असून, आरोपीचा पुतण्या गोविंदने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि सोशल मीडियावर अपलोड केला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहे. 

 

आरोपी आहे शिक्षक 
- आरोपी अलवर जिल्ह्यातील बानसूल येथे इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. त्याची पत्नी सरकारी शाळेवर शिक्षिका आहे. सध्या आरोपी फरार आहे. 
- मृत महिलेला तीन मुलं आहेत. पोलिस या प्रकरणाचा आता तपास करत आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाला मुलगा... पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...