आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Disturbing आहे हा Video! बेशुद्ध होईपर्यंत तरुणाला मारत होते लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढच्या स्लाइडवर पाहा मारहाणीचा व्हायरल होत असलेला VIDEO. - Divya Marathi
पुढच्या स्लाइडवर पाहा मारहाणीचा व्हायरल होत असलेला VIDEO.

बागपत (यूपी) - शेकडो लोकांची गर्दी आणि मारा-मारा, झोडा-फोडा असे आवाज. यूपीच्या बागपत जिल्ह्यात तालिबानी पद्धतीने एका तरुणाला गर्दीने शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. काही लोक लाठ्याकाठ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत होते. गर्दीत काही लोक मारो-मारो असे आवाज देत होते, काही जण तरुणाला लाथाबुक्क्या मारत होते. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस डिपार्टमेंटमध्ये खळबळ उडाली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल होत असलेला मारहाणीचा VIDEO!

 

जोपर्यंत बेशुद्ध नाही झाला तरुण, मारतच राहिले...
- वास्तविक हा व्हिडिओ बागपत जिल्ह्यातील जिवानी गावातला आहे.
- गावातील एका तरुणाचे भांडण शेजारच्या गावातील एका तरुणाशी झाले होते.
- याची माहिती तरुणाने गावात दिली, यानंतर काही गावगुंडांनी शेजारच्या गावातील तरुणाला पकडले आणि आपल्या गावाच्या मधोमध त्याला मारहाण सुरू केली.
- जोपर्यंत तो बेशुद्ध नाही झाला, तोपर्यंत तरुणाला मारत राहिले.

 

मारा-मारा असे येत होते आवाज...
- यादरम्यान ज्याला कुणाला संधी मिळाली त्यानेही त्याच्यावर थापडा-बुक्क्या आणि दांडक्याचा वर्षाव केला.
- यादरम्यान गावातील शेकडो लोक, यात महिलासुद्धा होत्या, त्या मूकदर्शक बनून राहिल्या. कुणीच हे भांडण सोडवले नाही.
- एवढेच नाही, गर्दीतील काही लोक तरुणाला आणखी मारा-मारा असे ओरडत राहिले.
- एवढे बेदम मारूनही त्यांचे मन भरले नाही तेव्हा त्यांनी त्याची गावातून धिंड काढली.

 

व्हिडिओ झाला व्हायरल...
- गर्दीच्या अशा क्रौर्याचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या एकाने शूट केला.
- दोन दिवस जुना असलेला हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.
- यानंतर पोलिस डिपार्टमेंटमध्येही खळबळ उडाली आहे.
- एएसपी अजय कुमार म्हणाले की, अनेक दिवसांपूर्वी मारहाणीची घटना झाली होती. एका तरुणाला पकडून त्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, तर दोघांना जेरबंद करण्यात आले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल होत असलेला मारहाणीचा VIDEO!

बातम्या आणखी आहेत...