आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलानेच वृद्ध आईला मरण्यासाठी सोडले, रडतच मारली तलावात उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंताबाईंनी मुलाच्या छळामुळे त्रस्त होऊन तलावात उडी मारली. - Divya Marathi
गंताबाईंनी मुलाच्या छळामुळे त्रस्त होऊन तलावात उडी मारली.

बैतूल - अभिनंदन सरोवरात शुक्रवारी दुपारी एका वृद्ध महिलेने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने सांगितले की, माझ्या मुलानंच माझ्यावर ही वेळ आणली. आता मला जगायचं नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला पोलिस स्टेशनमध्ये नेले.

- सूत्रांनुसार, तलावात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेचे नाव गंताबाई आहे. तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंताबाईंनी रडतच सांगितले की, त्यांचा मुलगा सारखा पैशांची मागणी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. पैसे दिले नाहीतर घाण-घाण शिव्या देतो. कधीकधी मारण्यासाठी अंगावर धावतो. एवढेच नाही, तो माझी मुलगी अन् जावयालाही शिवीगाळ करतो.

- मुलाच्या अशा वागण्याने मी खूप त्रस्त झाले आहे. आता मला घरी जायचे नाही. म्हणूनच मरणाचा विचार केला आणि येथे पोहोचून तलावात उडी मारली. पोलिसांनी महिलेला आत्महत्येपासून परावृत्त केले असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, वृद्ध आईच्या आपबीतीचा व्हिडिओ... व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...