आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अंगावरून गेली 55 डब्‍ब्‍यांची मालगाडी, वृद्धाला खरचटलेही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया (बिहार) - एका वृद्धाच्‍या अंगावरून 55 डब्‍ब्‍यांची मालगाडी ट्रेन जाण्‍याची घटना कोडरमा येथे रविवारी संध्‍याकाळी घडली. मात्र सुदैवाने यामध्‍ये वृद्धाला साधे खरचटलेही नाही. 

प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, वृद्ध रेल्‍वे ट्रॅक पार करण्‍याच्‍या प्रयत्‍नात होता.  मात्र त्‍याचदरम्‍यान ट्रॅकच्‍या मधोमध तो कोसळला. त्‍याने उठण्‍याचा प्रयत्‍नही केला. मात्र त्‍याचदरम्‍यान मालगाडी आली. हे पाहून वृद्ध ट्रॅकवरच पडून राहिला. तेथे उपस्थित असणा-या आसपासच्‍या लोकांनीही मालगाडी वृद्धाच्‍या अंगावरून जात असल्‍याचे पाहिले. ते पाहताच ते ट्रॅकजवळ धावत गेले व वृद्धाला तसेच ट्रॅकवर पडून राहण्‍याचे त्‍यांनी सांगितले. यामुळे वृद्धाल खरचटलेही नाही. मालगाडी गेल्‍यानंतर त्‍यांनी वृद्धाला ताबडतोब रूग्‍णालयात दाखल केले. उपचार करून वृद्धाला नंतर घरी पाठवण्‍यात आले.   

बातम्या आणखी आहेत...