आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाला शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पकडून ऑन द स्पॉट शिक्षा, व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगहा - बिहारच्या पश्चिम चम्पारण जिल्ह्यातील बगहामध्ये एका वयस्कर प्रेयसी-प्रियकराला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर गावकऱ्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. पूर्ण गावातून त्यांची मारहाण करतच धिंड काढली. ही घटना चौतरवा येथील लगुनाहा गावाची आहे.

प्रियकर आणि प्रेयसी दोघांचे वय 40-45 दरम्यान आहे. प्राप्त माहितीनुसार, दोघांचे अवैध संबंध गत 3 वर्षांपासून सुरू होते. गावकऱ्यांना याची माहिती होती. शनिवारी सकाळी काही लोकांनी दोघांना शेतामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर दोघांना बेदम मारहाण सुरू झाली. गावकऱ्यांनी आधी प्रियकराला बेदम मारून त्याच्या तोंडाला काळे फासले. एवढ्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही म्हणून त्याचे मुंडण केले. यानंतर त्याच्या तोंडाला चुना लावून चपला-बुटांचा हार घातला.

गावकऱ्यांनी महिलेलाही बेदम मारहाण केली. महिलेच्या तोंडालाही काळे फासण्यात आले आणि तिचेही केस कापण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेची वारंवार सोडा-सोडा म्हणून विनवणी करत राहिली, पण लोकांचा राग कमी झाला नाही. गावातील महिलाही तिच्यावर संतप्त झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे म्हटले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ व फोटो...

बातम्या आणखी आहेत...