आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटामध्ये रामदेव बाबांच्या उपस्थितीत 1 लाखांहून अधिक लोकांनी केला योग, गिनीज बूकमध्ये नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा - शहरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत 1 लाखांहून अधिक लोकांनी योगा करत गिनिज बुकात विक्रमाची नोंद केली. तीन दिवसीय राज्य स्तरीय योग शिबिराचा मुख्य सोहळा आरएसी ग्राऊंडवर झाला. यावेळी रामदेव बाबांनी योगासने केली. त्यांच्याबरोबर उपस्थितांनीही योग केला. 


पहाटे तीन वाजेपासूनच याठिकाणी लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. कार्यक्रमात दोन लाख लोक आल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत एकाचवेळी सर्वाधिक लोकांनी योगा करण्याचा विक्रम म्हैसूरच्या नावावर होता. गेल्यावर्षी योग दिनाला म्हैसूरमध्ये एखाचवेळी 55,506 लोकांनी योग केला होता. 


लंडनहून आली गिनीज बूकची टीम 
- गिनीज बूकमध्ये नोंदणी होण्यासाठी 5 स्तरांवर लोकांची संख्या मोजण्यात आली. लोक योगा करत आहे की नाही हेही तपासले गेले. गिनिज बूक ऑफ लंडनचे दोन जण त्यासाठी आले होते. 
- रजिस्ट्रेशन नंतर 50 लोकांवर नजर ठेवण्यासाठी एख स्वयंसेवक नेमला होता. 50 पैकी किती लोक योग करत आहे ते त्यांनी तपासले. 
- तसेच स्वतंत्र ऑडिटरही नेमले होते. त्यांनी परिसराचे मुल्यांकन केले. ड्रोनद्वारे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीही करण्यात आली. 


तीन दिवसांपासून होताहेत विक्रम 
- कोटामध्ये तीन दिवसांपासून योगाशी निगडीत विविध विक्रम रचले जात आहेत. सोमवारी आणि मंगळवारी 49 तर बुधवारी 51 विक्रम रचले. त्यांची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. 

 

पुढे पाहा, कार्यक्रमाचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...