आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक: कबरीमधून जिवंत निघाले नवजात बालक, उपचाराअभावी पुन्‍हा झाला मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपालगंज- बिहारच्‍या गोपालगंजमधील सदर हॉस्पिटलमध्‍ये डॉक्‍टरच्‍या चुकीमुळे नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. आजारी नवजात बालकाला उपचारासाठी एक कुटुंबिय रुग्‍णालयात घेऊन आले होते. रुग्‍णालयात डॉक्‍टरांनी बालकाला मृत घोषित केले व त्‍याचे अंतिम संस्‍कार करण्‍यास कुटुंबियांना सांगितले.


डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यामुळे कुटुंबियांनी बालकाला रितीरिवाजाप्रमाणे स्‍मशानभुमित दफन केले. मात्र क्रियाविधी आटोपल्‍यानंतर सर्वांनाच धक्‍का बसला. कारण कबरीमधून अचानक सर्वांना बाळाच्‍या रडण्‍याचा आवाज आला. त्‍यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब माती उकरत बालकाला बाहेर काढले. तेव्‍हा त्‍याच्‍या शरीरातून रक्‍त येत होते. कुटुंबियांनी तातडीने बालकाला पुन्‍हा उपचारासाठी रुग्‍णालयात नेले. मात्र योग्‍य उपचाराअभावी त्‍याचा रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. डॉक्‍टराच्‍या निष्‍काळजीपणामुळे आपल्‍या चिमुरड्याला जीव गमवावा लागल्‍यामुळे पालकांनी संताप व्‍यक्‍त केला. यामुळे रुग्‍णालयात काही वेळ तणावाचे वातावरण होते.

बातम्या आणखी आहेत...