आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीने टिळा लावला म्हणून मदरशातून हाकलले; केरळातील कोझिकोड येथील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोझिकोड- केरळातील कोझिकोड येथे इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीने टिळा लावला म्हणून तिला मदरशातून बाहेर काढण्यात आले. या मुलीने एका लघुपटात काम करताना डोक्याला चंदनाचा टिळा लावला होता. मुलीच्या वडिलांनीच ही माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे. माझी मुलगी हिना हिने एका लघुपटात काम करताना डोक्याला चंदनाचा टिळा लावला होता. यामुळेच माझ्या मुलीस मदरशातून काढून टाकण्यात आल्याचा आरोप उमर यांनी केला आहे. 


उमर म्हणाले, माझ्या मुलीचे नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली अन्यथा, तिला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली नाही. माझ्या मुलीला संगीत, अभिनय आणि वक्तृत्वात रुची आहे, असे त्यांनी म्हटले. उमर यांनी मदरशाविरोधात घेतलेल्या भूमिकेचे अनेक लोकांनी कौतुक केले आहे. तर काही लोकांनी मदरशाची काही चूक नसल्याचे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...