आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार व छेडछाडीचा आरोपाने व्यथित जयपूरमधील साधूने स्वत:चे लिंगच छाटले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- साधुसंतावर बलात्कार व छेडछाडीचा आरोप होत असल्याने व्यथित होऊन राजस्थानमधील एका साधूने आपले स्वत:चे लिंगच छाटल्याची धक्कादायक घटना जयपूर येथे घडली आहे. अनिल पुरोहित (40) असे त्याचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

आजकाल साधुसंतांवर बलात्कार व छेडछाडीचे मोठया प्रमाणात आरोप होत आहेत. गेल्या काही काळात लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अनेक साधु-संत व महात्म्यांची नावे आली आहेत. यामुळे लोकांचा साधुसंतावरचा विश्वास उडाला आहे. माध्यमांतही याबाबत सारख्या बातम्या झळकत असतात. यामुळे जयपूरमधील सेवागिरी धाममधील साधु अनिल पुरोहित त्रस्त होते. साधु-संतांची होत असणारी बदनामी बघून ते व्यथित झाले होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या खोलीत गेले व त्यांनी आपले लिंगच छाटून टाकले. त्यानंतर शिष्यांनी त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...