आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत अाणि तंत हे सगळेच बंडखाेर; स्त्रीमध्ये सृजनाची जाणीव; परिसंवादात डॉ. यशवंत पाठक यांचे मुक्त चिंतन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडाेदा- स्त्रीमनाची स्वयंपूर्णता त्यांच्या कवितेतून, त्यांच्या संत साहित्यातून येते. संत अाणि तंत हे सगळेच बंडखाेर अाहेत. अापला स्व अापल्याच अंतरंगात डाेकावून जे नितळ अारपार प्रतिबिंब दिसतं ताे संत. अत्यंत शक्ती ही स्त्रीमध्येच असते. सृजनाची संपूर्ण जाणीव तिच्यात असते. म्हणूनच तिला म्हटले अाहे की, गर्भाचे अावडी मातेचा डाेहाळा…. असे विश्लेषण ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. यशवंत पाठक यांनी केले.   


बडाेद्यात सुरू असलेल्या साहित्य संमेलनात मराठी संत कवयित्रींची बंडखाेरी अाणि स्त्रीवाद या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून शनिवारी ते बाेलत हाेते. ते म्हणाले, अंतरंगाचे भान अाल्याशिवाय अध्यात्माचा अ कळत नाही. जाे अध्यातही नाही अाणि मध्यातही नाही ताे अाध्यात्मिक असताे. ते अध्यात्म संत कवयित्रींच्या साहित्यात अाणि जगण्यात दिसते. अापल्या कर्मकांडाने नंतर अनेक गाेष्टींचा बाजारच केला. गणपतीचं उदाहरण देत ते म्हणाले, माेद म्हणजे अानंद अाणि क म्हणजे कर्तृत्व, कर्तृत्वाचे साधन अानंद त्याची गाभाऱ्यात अापण पूजा करताे ताे गणपती. दूध म्हणजे स्नेह, दही म्हणजे साधना, साखर म्हणजे गाेडवा. मध म्हणजे मधुमक्षिका हे सगळं या साहित्यातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले. परिसंवादात सहभागी वक्त्यांनीही अापल्या भूमिका मांडल्या.   


आजही वस्तुस्थिती तशीच  
१३ व्या शतकात संत कवयित्रींनी बंडखाेरी केली. त्या काळात जर अशी बंडाेखारी हाेऊ शकते तर अाज काळात अापण का नाही करू शकत? काळ बदललला पण वस्तुस्थिती तशीच अाहे. हे सांगताना रेखा घिये यांनी मुक्ताबाई, जनाबाईंचे दाखले दिले.

 

अाजही धडपड सुरू  
बंडखाेरी अाणि स्त्रीवाद अाधुनिक शब्द अाहेत. अात्म्याचा शाेध घेण्यासाठी मराठी संत कवयित्रींनी काम केले. लाैकिक अनुभवांचे मापदंडासाठी, अात्माेन्नतीसाठी कष्ट साेसण्याच्या जाणिवेतून त्यांचे शब्द उमटले. माणूस म्हणूून जन्माला या, संत म्हणून शिल्लक राहा हे दिसते. ही धडपड सुरूच अाहे. अाजही अनेक जणी अस्तित्वाचा शाेध घेतात. पण माणूस हाेण्याकडे संघर्ष अअभावानेच अाढळताे. सांस्कृतिक अाणि सामाजिक संघर्षाला संत कवयित्रींना सामाेरे जावे लागले. 

 

साेयीस्कर प्रतिमेत अडकवले  
स्त्रीवाद अलीकडचा अाहे, मग संत कवयित्रींच्या लेखनाकडे का जावेसे वाटते? कारण पितृसत्ताक संस्कृतीने स्त्रियांचा विचार केला नाही. साेयीस्कर प्रतिमेत अडकवून टाकलं. शाेषणाची जाणीव हाेऊच नये याची काळजी व्यवस्थेने घेतली. स्त्रीला जेव्हा भान अालं तेव्हा त्याला नकार देण्याचं काम तिने धैर्याने केलं. तिच्या लिहिण्यामागे निश्चित भूमिका दिसते. तिचा सांस्कृतिक चाैकटी माेडण्याचा प्रयत्न दिसताे. 

बातम्या आणखी आहेत...