आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा-राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात २ दिवस मुक्काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष व काँग्रेसने जागा वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. म्हणूनच भाजपाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवार व गुरुवारी उत्तर प्रदेशात तळ ठोकून असतील. 


संत कबीरनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचा बिगुल वाजवल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुक्कामामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीचा शहा दौरा करतील. त्याचबराेबर मिर्झापूर, आग्रा येथील दौराही करतील. या भेटीतून ते लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधी आपला मतदारसंघ अमेठीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतील. 


कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न
२००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या जोरावर अमेठी, रायबरेली, प्रतापगड, फैजाबाद, बहराइच, गोंडा, बाराबांकी, उन्नाव, कुशीनगर, कानपूर, अकबरपूर, डुमरियागंज, श्रावस्ती, महराजगंज, धनौरामध्ये विजय संपादन केला होता. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केेले आहेत. किमान सध्याच्या जागा तरी वाचवता येऊ शकतील, असे काँग्रेसला वाटते. 


लोकसभा प्रभारींसोबत बैठक
भाजपाध्यक्ष अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यात वाराणसी, मिर्झापूर व आग्र्याचा दौरा करतील. शहा बुधवारी सकाळी मिर्झापूरला पोहोचतील. काशी, गोरखपूर, अवध भागातील लोकसभेच्या प्रभारींसोबत चर्चा करतील. त्याद्वारे जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. 


मृताच्या नातेवाइकांना भेटणार
राहुल गांधी मृत मुस्लिम शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीदेखील भेट घेतील. आपले कृषी उत्पादन विक्री करण्यासाठी सरकारी खरेदी केंद्रावर चार दिवस तिष्ठत राहिलेल्या शेतकऱ्याचे या प्रतीक्षेत प्राण गेले होते. त्यावरून शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. 

बातम्या आणखी आहेत...