आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने विकासाचा अर्थ बदलला: अमित शहा, आज रायबरेलीत सभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - नरेंद्र मोदी सरकारने देशात विकासाचा अर्थ बदलून टाकला आहे. कर्नाटकात भाजप सत्तेवर आल्यास राज्याला ‘भ्रष्टाचारमुक्त’ मॉडेल म्हणून विकसित केले जाईल, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे.  


शुक्रवारी शहा यांनी व्यापारी व उद्योगसंबंधी संमेलनात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आम्ही कामाची पद्धत बदलून टाकली. शौचालयाविना घर नसावे, असे सरकारला वाटले. प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते असले पाहिजे. प्रत्येक गावात वीज असली पाहिजे. २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती आणि १२ लाख कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली होती. भाजप सरकारच्या अथक परिश्रमामुळे गत चार वर्षांत २९ लाख लोकांची बँक खाती सुरू झाली आणि साडेसात लाख शौचालये तयार करण्यात आली. नऊ लाख कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्यात आला, असा दावा शहा यांनी केला.   


कोणतेही सरकार देशातील सर्व तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. परंतु २०१४ मध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनावरून मोदी सरकारवर सातत्याने टीका होत आली आहे. परंतु पंतप्रधानांनी स्वयंरोजगाराचे नवनवीन मार्ग खुले करून दिले आहेत. कोणत्याही तारणाविना तरुणांना १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत अनेक कल्याणकारी योजनांची चांगली अंमलबजावणी केली आहे.

 

सोनियांच्या किल्ल्यात आज होणार सभा  
 काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीच्या रायबरेली मतदारसंघात अमित शहा यांची शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...