आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरत - तिरुपती साडीचे मालक आनंद सुरेखा यांच्या मृत्यूचा धक्का त्यांच्या पत्नी श्वेता सुरेखा (37) यांना सहन झाला नाही. पतीच्या मृत्यूच्या ठीक चौथ्या दिवशी सोमवारी श्वेता सुरेखा यांनीही आपल्या घराच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी उडी मारताना पाहून काही लोक त्यांना वाचवायला धावले, परंतु वाचवू शकले नाहीत. दुसरीकडे, हे हादरवून टाकणारे दृश्य सर्वात आधी पाहणारे चौकीदार महेश म्हणाले की, बिल्डिंगची काच फुटल्यावर मी वर पाहिले तेव्हा वहिनी (श्वेता सुरेखा) उडी मारत होत्या, मी ओरडलोही, पण त्या थांबल्या नाहीत.
दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींचीही वळली बोबडी...
सूर्या पॅलेसचे सिक्युरिटी गार्ड महेश गोस्वामी म्हणाले, मी सकाळी 8 वाजता ड्यूटीवर आलो. मागच्या गेटवर माझी ड्यूटी होती. त्या वेळी भाभीजी (श्वेता) यांचे भाऊ संजय त्यांची दोन मुले आणि मुदित यांना शाळेसाठी सोडायला खाली उतरले होते. दोघांना शाळेच्या गाडीत बसवून संजय भाई सूर्या पॅलेसच्या गेटमधून आले. त्याच वेळी काच फुटल्याचा आवाज आला. आवाज आल्याने मी इकडेतिकडे पाहिले तर काहीच दिसले नाही. मग माझी नजर वर गेली, पाहिले तर 5व्या मजल्याच्या खिडकीतून भाभीजी डोके बाहेर काढून उडी मारत होत्या. हे पाहून माझी भीतीने गाळण उडाली. मी जोरजोरात ओरडू लागलो.
क्षणार्धातच घडला अपघात...
महेश पुढे म्हणाले की, खाली उभे असलेले मनोज भाई आणि भाभीजींचे भाऊ संजय यांनीही वर पाहिले. श्वेता भाभीला खिडकीतून निघताना पाहून संजय आणि मनोज दोघेही त्यांना वाचवायला धावले. परंतु, या प्रयत्नात भाभीजी त्यांच्या पायाजवळ पडल्या. क्षणार्धातच हा अपघात घडला आणि त्यांचा मृत्यू झाला. चहुबाजूंनी रक्त पसरले होते. मनोज भाई आणि संजय भाई त्यांच्या पायावर पडून जखमी झाल्या होत्या. मी माझ्या पूर्ण आयुष्यात या प्रकारची घटना पाहिलेले नाही. काही केल्या माझ्या डोक्यातून ते दृश्य जात नाहीये.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला बसला होता धक्का...
आनंद सुरेखा यांची बहीण रश्मी म्हणाल्या, माझा भाऊ आनंदच्या निधनानंतर श्वेता वहिनी जणू शुद्धीतच नव्हत्या. त्यांनी सगळ्यांशी बोलणेदेखील बंद केले होते. सोमवारी अग्रसेन भवनात आनंद भैयाची शोकसभा ठेवण्यात आली होती. आम्हाला वाटले की, वहिनी धक्क्यातून सावरलेल्या नाहीत, त्या शोकसभेला कशा येतील. तरीही आम्ही विचारले तर त्या म्हणाल्या, मी शोकसभेला येईन.
नणंदेने पाहिला, भावजयीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह...
रश्मी म्हणाल्या, सकाळी 8.30 वाजता वहिनी तयार होण्यासाठी गेल्या. त्या बाथरूमममध्ये अंघोळीसाठी गेल्या होत्या. आम्ही सर्व बाथरूमच्या अवतीभोवती होतो. थोड्याच वेळात आम्ही बिल्डिंगच्या खालून जोरजोराने ओरडण्याचा आवाज ऐकला. आधी आम्हाला वाटले की, खालीच काहीतरी झाले आहे. आम्ही लगेच खाली गेलो. तेथे आम्ही पाहिले की, माझ्या वहिनीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे पाहून माझ्या पायाखालून जणू जमीनच सरकली. भावाच्या निधनानंतर वहिनीला धक्का बसलेला होता, पण त्या असे पाऊल उचलतील याची बिलकूल कल्पना नव्हती. आम्ही एकमेकांना धीर देत राहिलो. भाऊ-भावजयीच्या मृत्यूमुळे आमचे कुटुंब पूर्णपणे मोडून पडले आहे.
दोन तुकडे झाले होते आनंद सुरेखा यांच्या मृतदेहाचे...
- शुक्रवार 12 जानेवारी रोजी वेसूमध्ये ट्रकच्या धडकने तिरुपती साड़ीजचे मालक आनंद नवल सुरेखा यांचा मृत्यू झाला होता. सूर्या पॅलेस सिटीलाइटमध्ये राहणारे आणि मूळचे बेगूसराय(बिहार) चे 40 वर्षीय आनंद आपल्या नव्या क्रेटा कारने आभवा गावाजवळ गेले होते. तेथून परतत असताना विनायक मंदिराजवळ रात्री 8.30 वाजता ते कार रस्त्याच्या कडेला उभी करून रस्ता क्रॉस करत होते, यादरम्यान ट्रकने त्यांना जोरदार धडक मारली.
- रात्री 9 वाजता अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, मृताला एका ट्रकने चिरडले होते. पोलिसांच्या मते, अपघात एवढा भीषण होता की, आनंद यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. पोलिस अजूनही ट्रकचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.