आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षीय मुलीवर अत्याचार; दाेघा बलात्कारींना ठाण्यातून ओढले, भरचौकात ठेचून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर- एका चिमुकलीवर बलात्कार व तिच्या हत्येच्या दाेन संशयित आरोपींना संतप्त जमावाने सोमवारी पाेलिस ठाण्यातून बाहेर खेचले. नंतर त्यांची भरचौकात ठेचून हत्या करण्यात आली.  अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील तेजू गावात ही घटना घडली. आरोपी जगदीश लोहार (२५) अाणि संजय सोबोर (३०) हे चहाच्या मळ्यातील मजूर होते. 


आयजी नबीन पायेंग यांनी सांगितले की, १२ फेब्रुवारीला आपल्या घरातून बेपत्ता झालेल्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली हाेती. १७ फेब्रुवारीला चहाच्या मळ्यात तिचा मृतदेह सापडला होता. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. शरीरावर कपडे नव्हते. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपींना आसाममधून अटक केली होती. कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. त्यांना तेजू पोलिस ठाण्यात कैदेत ठेवले होते. याची माहिती कळताच ५०० ते १ हजार लोकांचा जमाव ठाण्याबाहेर जमला. पोलिस ठाण्यावर हल्ला करत त्यांनी पोलिसांना पकडून ठेवले. कोठडीतून आरोपींना सोडवून त्यांना फरपटत भरचौकात आणले गेले. यानंतर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. जमावाने पाेलिस ठाण्यातही तोडफोड केली.

बातम्या आणखी आहेत...