आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनसिंहांच्या पत्नी सरोज, मुले व सुनेच्या विरोधात न्यायालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कै. अर्जुनसिंह यांच्या पत्नीवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यांनी मंगळवारी न्यायालयात धाव घेत मुलगा व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजयसिंह, सून सुनीतासिंह, मोठा मुलगा अभिमन्यूसिंह यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अापणास केरवा कोठी (देवश्री) येथे राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. 


दंडाधिकारी गौरव प्रज्ञानन यांनी याप्रकरणी अजय ऊर्फ राहुलसिंह, सुनीतासिंह व अभिमन्यूसिंह यांना नोटिसा पाठवून सुनावणीसाठी १९ जुलै रोजी हजर राहण्याची विनंती केली आहे. अर्जुनसिंह यांच्या पत्नी सरोज ८३ वर्षांच्या असून मुलगी व जावयांकडे त्या राहू इच्छित नाहीत. सध्या त्या नोएडा येथे वेगळे राहतात. 


मंगळवारी वकील दीपेश जोशी, मुलगी वीणासिंह व उद्योगपती सॅम वर्मासोबत न्यायालयात आल्या. त्यांनी न्यायालयास सादर केलेल्या अर्जात म्हटले, माझी दोन्ही मुले अजय व अभिमन्यू यांनी मला घरातून बाहेर काढले आहे. 


माझा सांभाळ करण्यास त्यांनी नकार दिला. यामुळे नाइलाजाने न्यायालयाचा आधार घ्यावा लागत आहे. केरवा कोठी येथे राहू न दिल्यास आपणास गंभीर शारीरिक व अार्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात त्यांनी नमूद केले आहे. 


अजयसिंह काँग्रेसच्या तत्त्वांविरोधात काम करतात : सरोजसिंह यांचा आराेप 
सरोजसिंह यांनी अर्जात म्हटले, माझे पती कै. अर्जुनसिंह यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षात राहून महिला संरक्षण व निराधार लोकांसाठी काम केले. परंतु मुलगा अजय याने काँग्रेस पक्षाची तत्त्वे धाब्यावर बसवून मला माझ्याच घरातून बाहेर काढले. या वयात व असहाय अवस्थेत मला माझे घर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य कंठावे लागत आहे. 

बातम्या आणखी आहेत...