आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#कठुआ गँगरेप: ओरडू नये म्हणून पाजले गुंगीचे औषध, पोलिस म्हणाला- आताच मारू नका मलाही रेप करायचाय..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या गँगरेप आणि हत्येच्या प्रकरणात 3 महिन्यांनंतर चार्जशीट दाखल झाली. 8 आरोपींविरुद्ध दाखल 15 पानी चार्जशीटनुसार पूर्ण घटनाक्रमाचा मास्टरमाइंड मंदिराचा पुजारी संजी राम आहे. कठुआमधून बकरवाल समुदायाला हुसकावून लावण्यासाठी चिमुकलीला लक्ष्य बनवण्यात आले.

 

असे घडले क्रौर्य... 
तथापि, कठुआमध्ये 10 जानेवारी रोजी 8 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. 12 जानेवारीला तिच्या वडिलांनी हीरानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. 17 जानेवारीला चिमुकलीचा मृतदेह विछिन्न अवस्थेत जंगलात आढळला. मुफ्ती सरकारने 23 जानेवारीला पूर्ण प्रकरण जम्मू-काश्मीर क्राइम ब्रँचला सोपवले. क्राइम ब्रँचने एसआयटी स्थापन केली आणि तपासानंतर 9 एप्रिल रोजी 8 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे म्हणणे आहे की, लवकरच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाईल.


मंदिरात केला गँगरेप
चार्जशीटमध्ये सांगितले की, गँगरेपचा मास्टरमाइंड मंदिरातील पुजारी संजी राम आहे. त्याने कठुआमधून बकरवाल समुदायाला हटवण्यासाठी हे कृत्य केले. संजी रामने हे कृत्य 'देवस्थान' नावाच्या मंदिरात केले. त्याने आपल्या कटात अल्पवयीन पुतण्यासह आणखी 6 जणांना सामील केले. जंगलातून चिमुकलीला किडनॅप केल्यानंतर ती ओरडू नये म्हणून तिला हायडोस 'क्लोनाजेपम' नावाचे गुंगीचे औषध दिले. यानंतर तिला मंदिरात आणून तिच्यावर रेप केला.

 

हत्या करण्याआधीही केला रेप..
चार्जशीटनुसार, आरोपी चिमुकलीवर आळीपाळीने रेप करत होते. एवढेच काय, एका आरोपीने मेरठमध्ये शिकणाऱ्या आपल्या चुलत भावाला फोन करून बोलावले. म्हणाला- मजा लूटना है तो आ जाओ. चिमुकलीची हत्या करण्याआधी पोलिस अधिकार दीपक खजुरिया म्हणाला की, थोडं थांबा, मला आणखी एकदा रेप करायचा आहे. यानंतर चिमुकलीवर पुन्हा रेप करून तिची हत्या करण्यात आली.

 

दीड लाख रुपयांची देण्यात आली लाच
चार्जशीटमध्ये लिहिण्यात आले आहे की, अल्पवयीन आरोपींना वाचवण्यासाठी त्यांच्या आईने तपास करत असलेल्या पोलिस पथकाला दीड लाख रुपयांची लाच दिली होती. आरोपींमध्ये मंजी राम, त्याचा मुलगा विशाल, सब-इन्स्पेक्टर आनंद दत्ता, दोन विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक प्रवेश कुमार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध रेप, मर्डर आणि पुरावे नष्ट करण्यासह वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे पूर्ण प्रकरण?
चार्जशीटनुसार गँगरेपचा पूर्ण कट संजी रामने 4 जानेवारीला रचला. त्या परिसरातील बकरवाल समुदायाला हटवण्यासाठी त्यांनी आपल्या प्लॅनमध्ये अल्पवयीन पुतण्याला सामील केले. यानंतर संजी रामने आपला मित्र दीपक खजुरिया आणि विक्रमला गुंगीचे औषध आणायला सांगितले. चिमुकलीला किडनॅप करण्याचे काम अल्पवयीन मुलांना देण्यात आले. कारण अल्पवयीन मुलगा आणि मृत चिमुकली एकमेकांना ओळखत होते. 10 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलगा चिमुकलीला घेऊन जंगलात गेला. तेथे इतर आरोपी आधीपासूनच हजर होते. त्यांनी चिमुकलीला गुंगीचे औषध दिले आणि मग देवस्थानावर घेऊन गेले. तेथे बालिकेवर रेप करण्यात आला.

-13 जानेवारीला अल्पवयीन मुलाचा मित्र विशाल, संजी राम आणि अल्पवयीन मुलाने मंदिरात पूजा केली. यानंतर  पुन्हा चिमुकलीला गुंगीचे औषध देऊन रेप करण्यात आला. यानंतर तिची हत्या करण्यासाठी एका पुलावर नेण्यात आले. येथे पोलिस अधिकारी दीपक खजुरिया म्हणाला की, थांबा, मला आणखी एकदा रेप करू द्या आणि मगच मारा. यानंतर चिमुकलीवर पुन्हा रेप करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. 17 जानेवारीला जंगलात चिमुकलीचा क्षत-विक्षत मृतदेह आढळला.

बातम्या आणखी आहेत...