आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चे नव्हे, तर दुसऱ्यांचे आयुष्य सुखी करण्याची भीक मागतो हा सुशिक्षित भिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- दरबार साहिबच्या परिसरात अनेकदा कुर्ता-पायजम्यात उभा असलेला तरुण आपल्या पदव्या दाखवून भीक मागताना अनेकांनी पाहिला आहे. हा तरुण बेरोजगार आहे, असे प्रारंभी वाटते. पण त्याच्याशी बोलल्यानंतर समजते की, तो स्वत:साठी नव्हे, तर अनाथ लोकांच्या मदतीसाठी भीक मागतो. अमृतसरच्या विमानतळ मार्गावर राहणारा तरुण शर्मा पंजाब नशामुक्त करण्यासाठी तरुणांना एकत्र आणतो आहे. चार तरुणांना घेऊन त्याने ‘जागो पंजाब लहर’ सुरू केली होती. आता त्याच्या मोहिमेत १८० हून अधिक तरुण सहभागी झाले आहेत. तरुण शर्मा म्हणाला, गुरुपर्व किंवा मोठ्या उत्सवाच्या वेळी दरबार साहिब येथे जाऊन देणगी गोळा करतो. एखादा दानशूर त्यांना पाहून थबकतो. त्यांच्या मदतीसाठी पुढे येतो. आम्ही त्यांना गरजू लोकांची भेट घडवून आणतो. अशा किमान ८ तरुणांना आम्ही व्यसनमुक्त केले आहे.  


एजंटाकडून शर्माचीही फसवणूक
तरुण शर्मा यांनी सांगितले, २०१२ मध्ये त्यांना मलेशियातून परत पाठवले गेले. एका एजंटने त्यांना खोटी आश्वासने देऊन मलेशियाला पाठवले होते. परंतु पंजाबमध्ये परतल्यानंतर राज्यातील तरुणांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण  पाहून चिंता वाटली. २००८ मध्ये आमचा पंजाब असा नव्हता. २०१२ मध्ये मी स्वत:साठी नोकरी शोधली. पगारातील काही भाग गरजू लोकांसाठी खर्च करत होतो. अाता शहरातील एका हेल्थ क्लबमध्ये प्रशिक्षक आहे. पंजाबी तरुणांना विदेशात पाठवण्यासाठी फसवणूक करणाऱ्या एजंटाविरोधात आम्ही मोहीम सुरू केली आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...