आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम विकासाच्या मार्गावर, अॅक्ट इस्ट पॉलिसीने लोकांना जोडले; राज्याच्या पहिल्या GIS मध्ये मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदी म्हणाले आसाम विकासाच्या मार्गावर निघाले आहे. - Divya Marathi
पंतप्रधान मोदी म्हणाले आसाम विकासाच्या मार्गावर निघाले आहे.

गुवाहाटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी आसाममध्ये पोहोचले आहेत. परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर मोदी म्हणाले, आसाम विकासाच्या मार्गावर पुढे निघाला आहे. अॅक्ट इस्ट पॉलिसी येथील लोकांना जोडत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाणार आहे. आसाममधील जिओ-स्ट्रॅटिजिक फायदे गुंतवणूकदारांना सांगितले जाणार आहेत. या माध्यमातून राज्यात उद्योग-व्यवसाय वाढीस चालना देण्यात येत आहे. या परिषदेसाठी 4500 रिप्रेजिंटेटिव्हने रजिस्ट्रेशन केले आहे. 

 

पंतप्रधान काय म्हणाले 
- यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, काही बदलो की ना बदलो मात्र लोकांचे विचार बदलले आहे. माझे मत आहे की इंफाळपासून  गुवाहाटीपर्यंत आणि कोलकातापासून पाटण्यापर्यंत पूर्व भारत विकासाचे केंद्र बनले पाहिजे. 
- पंतप्रधान म्हणाले, आसियान-इंडिया यांची भागीदारी भलेही 25 वर्षे जुनी असेल परंतू आसियान देशांसमोबत आपले संबंध हजारो वर्ष जुने आहेत. 

साऊथ आशियायी देशांसाठी राज्याला एक्स्प्रेस वे करण्याची तयारी 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, ही परिषद फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) च्या मदतीने घेण्यात आली आहे. 
- या परिषदेचा उद्देश साऊथ आशियातील देशांसाठी राज्याला भारताचा एक्स्प्रेस वे करणे आहे. 
- राज्यात अॅग्रीकल्चर, फूड प्रोसेसिंग, ऑर्गेनिक फार्मिंग, बांस, हँडिक्राफ्ट, वस्त्रोद्योग आणि वॉटर ट्रान्सपोर्टेशन अशी नवी ओळख देण्याचा आहे. 

बातम्या आणखी आहेत...