आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-ट्यूब पाहून तीन राज्यांतील २१ जणांच्या एटीएममधून पैसे लाटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सादुलपूर (चुरू)- राजस्थानसह पंजाब व हरियाणातील दोन डझन शहरात एटीएम बदलून लोकांची दहा ते बारा लाखांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस मोबाइल लाेकेशनच्या आधारावरून पकडण्यात आले. आरोपीने यू़-ट्यूबवर व्हिडिओ पाहून एटीएम कार्ड बदलून रुपये काढण्याची कला अवगत केली. यानंतर फक्त सात महिन्यांत तीन राज्यांतील २१ हून अधिक लाेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपीला पकडण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून चुरू पोलिस त्याच्या मागावर हाेते. त्याला श्रीगंगानगर जिल्ह्यातील सादुल शहरात अटक करण्यात आली. 


पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात त्याने अनेक प्रकरणांची कबुली दिली आहे. त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांची धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापे टाकले आहेत. सीकर जिल्ह्यातील पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत न्यौराणा येथील रहिवासी मनीष (२०) यास विशेष पथकाने अटक केल्याची माहिती एएसपी राजेंद्रकुमार यांनी दिली. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असून त्याना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीच्या ताब्यातील विविध बँकांची २० एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. ६ एप्रिल रोजी गावात एक एटीएम कार्ड बदलून १ लाख ८९ हजार रुपये काढल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या खात्यांचे बँक डिटेल्स मागवले. त्यातील एटीएमद्वारे झालेल्या व्यवहारांच्या ठिकाणांचे मोबाइल लोकेशन त्यांनी मिळवले होते. 


राजस्थानसह हरियाणा, पंजाबमध्येही केली चोरी 
आरोपी मनीष मीणा याने दोन अन्य साथीदारांच्या मदतीने सुमारे दोन डझन चोऱ्या केल्या. त्यातून दहा ते बारा लाख रुपयांची फसवणूक केली. हनुमानगड जिल्ह्यात ४ गंगानगर, झुंझुनु, सीकरमध्ये प्रत्येकी दोन, जयपूर येथे चार, अलवर येथे दोन व पंजाबमध्ये तीन, तर हरियाणात दोन चोऱ्या केल्या. 


पोलिसांपासून वाचण्यासाठी बदलत होता लोकेशन 
पोलिस पथकाने न्यौराणाजवळ तळ ठोकून मोबाइलचे लोकेशन घेतले. त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, आरोपीने मोबाइल बंद केला. काही वेळानंतर त्याचे लोकेशन उदयपूर वाटी व नंतर झुंझुनू असे दिसले. झुंझुनूतील हॉटेल्सची तपासणी केली तेव्हा तो तेथे सापडला नाही. सकाळी त्याचे लोकेशन चुडैला येथे आढळले. तेथील ढाबेवाल्यांकडे चौकशी केली असता तीन संशयित रात्री येथे थांबल्याचे समजले. पण तासाभरापूर्वीच ते येथून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. चुरू येथील पंखा सर्कलजवळ २३ जून रोजी या तिघांनी एटीएम बदलून पैसे काढल्याची माहिती पोलिस शिपाई नरेशकुमार यांनी दिली. तेथून ते नोहर गावाकडे निघाले. पोलिस त्यांचा पाठलाग करत नोहरला पोहोचले. तेथेही सकाळी ११ वाजता एटीएम बदलून ३७ हजार रुपये काढले. 


बीए अंतिम वर्षाला शिकत आहे आरोपी 
आरोपी बीए अंतिम वर्षात असून डिसेंबर २०१७ पासून त्याने साथीदारांच्या मदतीने रुपये काढून घेण्याचे प्रकार सुरू केले. त्याला ही कल्पना यू़ट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ पाहून सुचली. तेव्हापासून त्याने एटीएम कार्डाचे क्लोनिंग करणे सुरू केले. लोकांचे एटीएम बदलून तो त्यांची फसवणूक करत हाेता. 

बातम्या आणखी आहेत...