आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबलरामपूर - येथील वनक्षेत्राजवळील गावात उसाच्या शेतात लहान मुलांना अस्वलाचे नवजात पिल्लू आढळले, त्यांनी ते विदेशी प्रजातीचे श्वान समजून घरी आणले होते. पिल्लाला पाहण्यासाठी घरी स्थानिकांची गर्दी जमली होती. यादरम्यान वन विभागाला ही माहिती कळली आणि त्यांनी ते पिल्लू जनावरांच्या दवाखान्यात नेले. तेथे त्याची तपासणी करण्यात आली. सध्या पिल्लू तेथेच डॉक्टरांच्या देखरेखीत असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- बलरामपूरच्या राजपूर वनक्षेत्रातील छलकुपारामध्ये गुरुवारी संध्याकाळी 4 वाजेदरम्यान उसाच्या शेतात लहान मुलांना अस्वलाचे पिल्लू आढळले.
- मुलांनी ते विदेशी ब्रीडचे श्वान समजून त्याला घरी आणले. घरी त्याला चपाती वगैरे खाऊ घालण्यात आली.
- त्याला पाहण्यासाठी लोकांची भलीमोठी गर्दी होत होती. काही लोकांना वाटले की, हे कुत्र्याचे पिल्लू नसून दुसरेच काहीतरी आहे. यावर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली.
- वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी ते अस्वलाचे पिल्लू असल्याचे सांगितले. वन विभागाने ते पिल्लू आपल्या ताब्यात घेतले.
- शुक्रवारी नवजात पिल्लाला जनावरांच्या दवाखान्यात नेऊन डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डॉक्टर म्हणाले की, हे 4-5 दिवसांचे पिल्लू आहे. त्याची तपासणी करण्यात आली असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीतच राहील. काही दिवसांनी त्याला पुन्हा सोडण्यात येईल.
फोटो : विश्वास गुप्ता
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.