आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रवणबेळगोळ येथे तीन तास चालला बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रवणबेळगोळ- दर बारा वर्षांनंतर होणारा श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर बाहुबली महास्वामीचा पहिला महामस्तकाभिषेेक तीन तास चालला. सकाळपासून डोंगरावर जाण्यासाठी गर्दी होती. दुपारी २.३५ वाजता प्रत्यक्षात जलाभिषेकाने सुरू झालेला मस्तकाभिषेक सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. जलाभिषेकासह पंचामृत अभिषेक पाहून जनसमुदायाने बाहुबली महास्वामीजीचा जयघोष केला. शनिवारी पहिला मस्तकाभिषेक कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री रवी हेगडे यांच्या उपस्थितीत झाला.  


श्रवणबेळगोळ येथील इंद्रगिरी पर्वतावर बाहुबलीची ५८ फुटांची उभी मूर्ती असून तेथे दर बारा वर्षांनी महामस्तकाभिषेक होत असतो. यंदा १७ ते २५ फेब्रुवारीपर्यंत रोज, तर त्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत दर रविवारी मस्तकाभिषेक होईल.     


पहिला मस्तकाभिषेक असल्याने सकाळपासून श्रवणबेळगोळ येथे भक्त येत होते. यावेळी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. त्यागीनगरसह विविध ठिकाणी गर्दी होती. दुपारी १२ नंतर अभिषेकाला जाण्यासाठी  पासधारकांना प्रवेश होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्षात अभिषेक पाहता आला नाही.     


दुपारी २.३५ वाजता प्रत्यक्ष अभिषेकास सुरुवात झाली. जलाभिषेक, चंदन, अष्टगंधचा अभिषेक करण्यात आला.  सायंकाळी साडेपाच वाजता पंचामृत अभिषेक सुरू करण्यात आले. बाहुबली मूर्ती पंचामृताने भरीव दिसत होती. रविवारी दुपारी १२ पासून अभिषेक होणार आहे. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 


कलशमान पटणी यांना ११.६१ कोटी देणगी   

पहिल्या मस्तकाभिषेकचा मान राजस्थानमधील अशोक पटणी परिवाराने मिळवला. त्यासाठी त्यांनी ११.६१ कोटी रुपये देणगी दिली. मागील बारा वर्षांपूर्वी अभिषेकचा मान त्यांनी १.०८ कोटी देणगी देऊन मिळवला होता. त्यानंतर पंकज जैन, राजाभाई सुरतवाले यांनी मिळवला.

बातम्या आणखी आहेत...