आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापानिपत - हरियाणाच्या रोहतकमध्ये आणखी एका गायिकेची हत्या करण्यात आली. असे चौथ्यांदा घडले जेव्हा एखाद्या उभरत्या हरियाणवी महिला कलाकाराची हत्या झाली. याआधी तीन चर्चित घटना समोर आल्या जेव्हा गायिकांचा निर्घृण खून करण्यात आला. यात हरियाणवी गायिका पासी नैय्यर, बीनू चौधरी, डान्सर हर्षिता दहिया यानंतर आता ममता शर्मा यांचा समावेश आहे. गुरुवारी ममताचा मृतदेह रोहतकच्या बनियानी गावातील शेतात आढळला. तिची गळा चिरून निर्घ्ज्ञृण हत्या करण्यात आली होती. ममता रविवारी गोहानामध्ये एका कार्यक्रमासाठी घराबाहेर निघाली होती, पण अचानक बेपत्ता झाली. गायब झाल्यावर चार दिवसांनी तिचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची एफआयआर नोंदवली, परंतु पोलिस काहीच करू शकले नाहीत.
अशी झाली 3 कलाकरांची हत्या...
हरिद्वारमध्ये झाडून झाली होती बीनू चौधरीची हत्या
- प्रसिद्ध सिंगर आणि स्टेज परफॉर्मर बीनू हरियाणाच्या रोहतकची रहिवासी होती. ती अश्लील विनोद आणि गाणी गाऊन चर्चेत आली होती. ती हरियाणाशिवाय राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात खूप प्रसिद्ध झाली होती.
- बीनू चौधरीची हरिद्वारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. यात रोहतकच्याच एका तरुणाचे नाव आले होते.
- सूत्रांनुसार, बीनू संदीप कुमारवर प्रेम करत होती, पण दुसऱ्याशी लग्न झाल्यावर तिने संदीपला सोडले होते. आरोप आहे की, संदीपने बीनूच्या हत्येचा कट रचला आणि रोहतकच्याच राहणाऱ्या सुपारी किलर सुमीत ऊर्फ ढीले याला सुपारी दिली होती.
- कटानुसार, संदीपने बीनूला कार्यक्रमाच्या बहाण्याने हरिद्वारला बोलावले. बीनू आपल्या टीमसोबत हरिद्वारला पोहोचली तेव्हा तिला एका धर्मशाळेत थांबवण्यात आले. 29 मार्च 2012 रोजी बीना आपल्या कारने एकटी जात होती, तेव्हाच बीनूवर गोळ्या झाडण्यात आला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पासी नैय्यरचीही गोळ्या झाडून हत्या...
- प्रसिद्ध गायिका पासी नैय्यरची हत्याही काही वर्षांपूर्वी झाली. तिचा मृतदेह हसनगड जवळून हस्तगत करण्यात आला.
- पासीची हत्याही गोळ्या झाडून झाली होती. पासी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी जात होती तेव्हा वाटेत तिच्या गोळ्यांनी अक्षरश: चाळणी करण्यात आली.
- या हत्याकांडातही पासीच्या एका जवळच्याचे नाव समोर आले होते.
ऑक्टोबरमध्ये हर्षिता दहियावरही झाडण्यात आल्या गोळ्या...
- ऑक्टोबर 2017 मध्ये हरियाणवी लोकगायिका आणि डान्सर हर्षिता दहिया (20) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
- सोनिपतच्या वाटेत एका कारने तिच्या गाडीला ओव्हरटेक करून रोखले. त्यातून 2 जण बाहेर आले. हर्षिता दहियाच्या मित्रांना पळून जाण्यासाठी सांगितले. यानंतर जवळून त्यांनी हर्षितावर 4 गोळ्या झाडल्या.
- या घटनेच्या काही तास आधीच हर्षिताने फेसबुकवर धमकी मिळाल्याचे लिहिले होते. व्हिडिओत ती म्हणाली होती की, मी धमक्यांना भीक घालत नाही. नंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तिच्या भावजीला अटक केली होती.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.