आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : भय्यूजींच्या संपर्कात असलेल्या गुंड लाेकांनी अनेकांना फसवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- संत भय्यू महाराज अात्महत्या प्रकरणात पाेलिसांचा तपास अाता त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लाेकांवर केंद्रित झाला अाहे. गुन्हे दाखल असलेले काही लाेक इंदूर व पुण्यातील अाश्रमात भय्यू महाराजांच्या संपर्कात हाेते, अशी माहिती पाेलिसांना मिळाली अाहे. त्यांनीच भय्यू महाराजांशी जवळीक साधून अनेकांची फसवणूक केल्याने अाश्रमात येणारे माेठे व्यापारी व समाजसेवक महाराजांपासून दूर राहू लागले हाेते. 


याशिवाय अाश्रमातील काही सेवेकरी व ट्रस्टशी संबंधित लाेकांकडून पाेलिसांना माहिती मिळाली की, महाराजांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच महाराजांना दु:ख दिले. पत्नी व मुलीशिवाय असे अनेक नजीकचे लाेक हाेते, जे महाराजांचे खास बनून अाश्रम व संस्थेच्या नावावर अार्थिक व्यवहार करायचे. त्यांच्यावरही पाेलिसांना संशय अाहे. त्यासाठी पाेलिस काही संशयिताच्या काॅल डिटेल्स तपासत अाहेत. तसेच भय्यू महाराजांना एखाद्या षड्यंत्रात तर फसवले जात नव्हते ना? या दिशेनेही पाेलिस तपास करत अाहेत. 


बुधवारी खजराना पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मनाेज रत्नाकर यांनी भय्यू महाराजांचे माेठे भाऊ दिलीप देशमुख (६२) व अरुण देशमुख (५९) यांचे जबाब घेतले. या चाैकशीत दाेन वर्षांपूर्वी भय्यू महाराजांनी अापणास श्री सद‌्गुरू धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे (इंदूर) चेअरमन बनवले हाेते. ते तेथे त्यांच्या वाडवडिलांच्या अनेक एकर जमिनीची देखरेख व संस्थेच्या सेवाकार्यास पुढे नेत हाेते, असे दिलीप देशमुख यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...