आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांची आत्महत्या आवेशात नव्हे, विचारपूर्वक; ७ निरिक्षणे जोडून पोलिसांनी काढला निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर ८ व्या दिवशी न्यायवैद्यक शाखेने पोलिसांना अहवाल दिला. यानुसार भय्यू महाराजांनी क्षणिक आवेशात म्हणजे रागाच्या भरात स्वत:वर गोळी झाडून घेतलेली नाही, तर त्यांनी १५ ते २० मिनिटे विचार करून उचललेले पाऊल आहे. 


तज्ज्ञांच्या मते, आत्महत्येच्या एक लाख प्रकरणांपैकी अशा प्रकारचेही एक प्रकरण असते. डीआयजी हरिनारायणाचारी मिश्रा यांच्या मते, न्यायवैद्यक अहवाल अजून मिळालेला नाही. पण अधिकाऱ्यांनी काही मुद्दे सांगितले, त्यानुसार थंड डोक्याने केलेली ही आत्महत्या आहे, क्षणिक अावेशात येऊन केलेली नाही. तसेच पोलिसांनी अजून तरी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.  


पत्नीला हाताने साडी दिली, गोळीचा आवाज ऐकू नये म्हणून नाेकराला खाेलीपासून दूर पाठवले...  

१. आत्महत्येच्या दिवशी (१२ जून) भय्यू महाराजांनी पत्नी आयुषीला आपल्या हाताने साडी दिली. तयार होऊन पदवी घेण्यास जाण्याचे सुचवले. सकाळी उठल्यानंतर आयुषीसोबत चहा घेतला. 


२. रिव्हॉल्व्हर लपवून नेले.  त्यांनी गोळीचा आवाज ऐकू नये म्हणून खोलीच्या आसपास असलेल्या नोकरांना शिडीवरही थांबू दिले नाही. 


३. आत्महत्या आणि सुसाइड नोट वेगवेगळ्या खोलीत. सुसाइड नोट डायरीत लिहिणे आणि डायरीला तीन डायऱ्यांच्या मध्ये व्यवस्थित ठेवणे. अशी व्यवस्था तणावमुक्त असलेली व्यक्तीच करू शकते.  


४. आत्महत्या करणारी व्यक्ती एक तर फाशी घेते अथवा स्वत:वर गोळी झाडून घेते. त्याचा मोबाइलही इतस्तत: पडलेला असतो अथवा सुसाइड नोट खिशात आढळते. पण महाराजांनी असे काही केलेले नाही. 


५. आत्महत्या करणारी व्यक्ती सुसाइड नोटमध्ये नेहमी आपल्या रक्ताच्या नात्यातील किंवा खूप निकटच्या व्यक्तीचा उल्लेख करते. परंतु महाराजांनी मुलगी कुहू अथवा पत्नी आयुषीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी आईबद्दलही काही लिहिलेले नाही. यामुळे ते पत्नी व मुलीवर रागावलेले होते. परंतु पत्नी व मुलीला पोलिसांच्या तपासाच्या झंझटीपासून वाचवूही इच्छित होते.  


६. कुहूवर त्यांचे खूप प्रेम होते. यामुळे मरण्यापूर्वी त्यांनी तिची खोली स्वच्छ करवून घेतली होती. नवे बेडशीट टाकलेले होते. बेडशीट रक्ताने खराब होऊ नये म्हणून खोलीतील एका कोपऱ्यात बसून गोळी झाडून घेतली.  


७. सुसाइड नोटमध्ये दोन वेगवेगळ्या वाक्यांत त्यांनी आपल्या मनातील विचार मांडले. प्रत्येक वाक्याखाली सही केली. म्हणजे डायरीच्या एका पानावर दोन वेळा सही केली, असे प्रथमच पाहण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...