आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती, औरंगाबाद ते काशी पर्यंत चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. चोपडे हे मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी आणि बायो इन्फोर्मेटिक्समधील तज्ज्ञ आहेत. - Divya Marathi
डॉ. चोपडे हे मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी आणि बायो इन्फोर्मेटिक्समधील तज्ज्ञ आहेत.

औरंगाबाद/वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरु पदी महाराष्ट्रातील औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डॉ. बी.ए.चोपडे यांची नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत सोशल मीडियावर याबद्दल चर्वित चर्वण सुरु होते. विद्यापीठाच्या अधिकृत सुत्रांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे औरंगाबादमध्येही डॉ. चोपडे काशी विद्यापीठात जात असल्याची चर्चा आहे. 

 

कुलगुरुंनी केला अभिनंदनाचा स्वीकार

- DivyaMarathi.Com ने कुलुगुरुंशी संपर्क केला असता त्यांनी अभिनंदनाचा स्वीकार केला. नियुक्ती पत्र अद्याप मिळाले नसल्याचे ते म्हणाले. पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी.विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन वाराणसीला रवाना होणार असल्याचे डॉ. चोपडे यांनी सांगितले. 

- बनारस हिंदू विद्यापीठाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर प्रो. चोपडे यांची नियुक्ती नक्की असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केल्याचे  त्यात म्हटले आहे. 
- अशीही चर्चा आहे की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रो. डॉ. चोपडे यांच्या नियुक्तीचे पत्र विद्यापीठाला पाठवले आहे. 

 

कोण आहेत डॉ. चोपडे 

डॉ. चोपडे हे मायक्रो बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी आणि बायो इन्फोर्मेटिक्समधील तज्ज्ञ आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये पेपर सादर केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...