आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटकात आगामी सरकार भाजपचे : राजीव प्रताप रुडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोअर टीमचे सदस्य राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. रुडी  यासंदर्भात हेब्बल येथे मतदान केंद्र प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.  


नुकत्याच आलेल्या निवडणूक सर्वेक्षणाचा दाखला देत रुडी यांनी कोणतीही शक्ती भाजपला रोखू शकत नसल्याचे सांगितले. पक्षाच्या जागा वाढलेल्या दिसत असून उर्वरित दिवसांत पक्षाची स्थिती आणखी बळकट होईल. याचाच परिपाक म्हणून राज्यात भाजप सरकार पूर्ण बहुमताने येईल. मोदी यांच्या निवडणूक प्रचारास सुरुवात झाल्यानंतर राज्यात भाजपची स्थिती आणखी चांगली होईल. पक्ष बळकट होण्यात मतदान केंद्र स्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हेब्बल भाजपचा मजबूत आधार असल्याचे सांगत रुडी म्हणाले, मतदार विद्यमान आमदार वाय.ए. नारायणस्वामी यांच्या बाजूने अाहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवार केले आहे.  दुसरीकडे कर्नाटक निवडणुकीत भाजपला संधी मिळेल का, याकडे देशाचे लक्ष आहे. 

बातम्या आणखी आहेत...