आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्‍नाव रेप केस; भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगरला CBIने घेतले ताब्‍यात, 3 गुन्हे दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उन्‍नाव सामुहिक बलात्‍कार प्रकरणी आरोन असलेले भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगरला सीबीआयने ताब्‍यात घेतले आहे. आज पहाटे लखनऊ राहत्‍या घरातून त्‍यांना अटक करण्‍यात आली. गुरूवारीच पोलिसांनी सेंगरच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला होता मात्र, अटक केली नव्‍हती.  आमदाराला अटक का केली नाही, असा प्रश्न हायकोर्टाने विचारला होता. त्यावर सरकार म्हणाले होते की, 'पुरेसे पुरावे नाहीत. तपास सीबीआयकडे सोपवला आहे, यामुळे कारवाईही तेच करतील'. सरकारने बुधवारी रात्री उशिरा सीबीअाय चौकशीची शिफारस केली. त्याला केंद्राने मंजुरी दिली. पीडितेनुसार आमदार सेंगर व त्याच्या गुंडांनी गतवर्षी ४ जूनला तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.

 

कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल
- कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरोधात गुरुवारी पहाटे भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376, 506 आणि पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...