आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालमध्ये पंडित नेहरु बिहारमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यावर शाई फेक, 12 दिवसांत 8 पुतळ्यांची विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगालमध्ये 16 मार्च रोजी नेहरुंच्या पुतळ्यावर शाई फेकण्यात आली. - Divya Marathi
पश्चिम बंगालमध्ये 16 मार्च रोजी नेहरुंच्या पुतळ्यावर शाई फेकण्यात आली.

कोलकाता / पाटणा - महापुरुषांच्या पुतळ्यांची नासधूस आणि विटंबनेचे सत्र अजून काही थांबलेले नाही. पश्चिम बंगालमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु  तर बिहारमधील बेगुसराय येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शाई फेक करण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 12 दिवसांमध्ये पुतळा विटंबनेची ही आठवी घटना आहे. 

 

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल 
- पश्चिम बंगालमधील कटवा येथील टेलिफोन मैदानावरील पंडित नेहरुंच्या पुतळ्यावर शुक्रवारी काळी शाई फेकण्यात आली. तर, बिहारमधील बेगूसराय येथील बलिया बाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला काळी शाई लावण्यात आली आहे. 
- दोन्ही प्रकरणांमध्ये प्रशासनाने शनिवारी सकाळी पुतळे धुवून स्वच्छ केले. त्यासोबतच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

12 दिवसात पुतळा विटंबनेच्या सात घटना 
- 5 मार्च : पुतळा विटंबनेच्या घटनांची सुरुवात त्रिपुरापासून झाली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर डावे विचारवंत आणि रशियन क्रांतिकारक ब्लादिमीर लेनिन यांच्या पुतळा पाडण्यात आला. 
- 6 मार्च :  त्रिपुरामध्ये 48 तासांत लेनिनचा दुसरा पुतळाही जमीनदोस्त करण्यात आला. राज्यातील बेलोनिया येथे हा प्रकार घडला. 
- 6 मार्च : तामिळनाडूतील वेल्लोर येथे सामाजिक सुधारक ईव्ही रामास्वामी यांच्या पुतळ्याची नासधूस केली गेली. पुतळ्याचा चष्मा तोडण्यात आला. 
- 6 मार्च : मेरठ येथील मवाना येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. 
- 7 मार्च  : कोलकातामध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले.

- महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली होती. 

बातम्या आणखी आहेत...