आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी तयार नव्हते कुटुंबीय, गर्लफ्रेंडचा गळा कापून वीजेच्या ताराला चिटकला प्रियकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांसवाडा/गनोडा (राजस्थान)- येथील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे गंभीर जखमेचे निशान आहे. माहिती मिळताच थोड्याच वेळात सर्वत्र बातमी पसरली. लोक जमा होऊ लागले. दरम्यान सरपंचाने पोलिासांना घडलेल्या प्रकराची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मृतदेह सांगोली येथील रहिवाशी 22 वर्षीय तरूणी अनिता निनामाचा असल्याचे सांगितले. गळ्यावर गंभीर वार असल्यामुळे पोलिसांनी आसपास हत्या करण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेतला.
- या दरम्यान 100 मीटर अंतरावर एका तरूणाचा देखील मृतदेह आढळून आला. त्याची ओळख हितेष वडेरी (25) अशी करण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाइकांशी विचारपूस केली तेव्हा प्रेमसंबंधातून ही घटना घडली असल्याचे समोर आले. 


घरातून होते गायब...
- लोहारिया येथील पोलिस अधिकारी चैलसिंह यांनी सांगितले की, सदर घटना शनिवारी रात्री घडली. हे प्रेमी युगूल रात्रीपासूनच गायब होते.
- घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर समोर आले की, आधी हितेषने एका धारदार शस्त्राने अनिताच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. यानंतर हितेष 100 मीटर अंतरावर असलेल्या विजेच्या पोलवर चढला. येथे विजेचा तिव्र झटका लागल्याने तो होरपळून खाली कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. दोघांचे सोमवारी पोस्टमार्टम करण्यात येईल.
 


अनिताचे झाले होते लग्न....
- पोलिसांनी सांगितले की, अनिता आणि हितेष दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. परंतु, दोघांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नसाठी तयार नव्हते, त्यांच्या लग्नाला विरोध होता
- अनिताच्या नातवाइकांनी घाटोल येथील जाबुंडी गावात काही वर्षांपूर्वी तिचे लग्न लावून दिले होते.
- दोन वर्षांपूर्वी अनिताचा पति आणि सासरवाडी याच्यातील मतभेदामुळे सामाजिकरित्या अनिताची सुटका केली, तेव्हापासून अनिता आपल्या वडिलांच्या घरीच राहत होती.
- या दरम्यान अनिता आणि हितेष यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे शनिवारी घरी गायब झाले होते. त्यांचा नातेवाईकांनी शोध देखील घेतला. त्यानंतर रविवारी दोघांचे मृतदेह आढळून आले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...