आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर-वधू वरमाला घालण्यास उभे, मागून BFचा आवाज येतो I LOVE U...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (उत्तर प्रदेश) - नवरदेव-नवरी लग्नाच्या बंधनात अडकत आहे. सर्व विधी व्यवस्थित पूर्ण होत आहेत, सर्वात महत्त्वाचा विधी, एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यास काहीच अवधी बाकी आहे... आणि तेवढ्यात एक युवक स्टेजवर येतो.  नववधूला 'आय लव्ह यू' म्हणत, तिच्याच लग्न मंडपात तिला प्रपोज करतो. हा काही एखाद्या बॉलिवूड सिनेमातील सीन नाही तर, कानपूर शहरात 19 एप्रिल रोजी एका लग्नात घडलेला जिवंत प्रसंग आहे. 

 

काय घडले या नंतर...
- वर मनोजने सांगितल्यानुसार, 19 एप्रिल रोजी तो वरात घेऊन नौबस्ता येथे पोहोचला. लग्नाला सुरुवात झाली. वरमाला टाकण्याची घडी समीप आली आणि त्याचवेळी एक युवक स्टेजवर चढला. त्याने माइकचा ताबा घेतला आणि जाहीररित्या नववधूला प्रपोज केले. तो म्हणाला, 'हॅलो एव्हरी बडी... मला काही बोलायचे आहे.' यानंतर नवरीचे नाव घेत तो म्हणाला, '...आय लव्ह यू... आय वाँट टू मॅरी यू?' हे ऐकताच नवरदेव मनोजने वरमाला घालण्यास नकार दिला. मुलाचे वऱ्हाड लग्न मंडपातून थेट पोलिस स्टेशनला पोहोचले. 
- मनोज म्हणाला, एक युवक स्टेजवर चढला आणि त्याने माइक हातात घेतला. तेव्हा वाटले की हा अँकर असेल, लग्नविधी पुढे घेऊन जात असेल. मात्र त्याने माइकचा ताबा घेऊन थेट आमच्या लग्नात नवरीला प्रपोज केले. 
- हे सर्व सुरु असताना नवरीने तिच्या भावांना इशारा केला, त्यांनी त्याला तिथून हकलून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागला की त्याच्याकडे मुलीचे व्हिडिओ आणि चॅट मेसेज आहे. 
- स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येथे क्लर्क असलेल्या मनोजचा आरोप आहे की जेव्हा त्याने लग्नाला नकार दिला तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना बोलावून हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला. 
- दुसरीकडे, मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की त्यांनी लग्नासाठी 5 लाख रुपये खर्च केले. मुलाने एनवेळी कारची डिमांड केली त्यामुळे वाद वाढला. मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या प्रियकराने लग्नात गोंधळ घातल्याचा आरोप सपशेल फेटाळला आहे. 
- पोलिस अधीक्षक अशोक वर्मा म्हणाले, वर आणि वधू दोन्ही पक्षाकडील लोक एकमेकांवर आरोप करत आहेत. पोलिस या प्रकणाचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...