आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर अशी वाट पाहत होती नवरी; नवरदेवाचा मित्र म्हणाला, अब्रू वाचवायची असेल तर मी येतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 डिसेंबरला वऱ्हाडाची वाट पाहत अशी सजून-धजून बसली होती नवरी. - Divya Marathi
10 डिसेंबरला वऱ्हाडाची वाट पाहत अशी सजून-धजून बसली होती नवरी.

कानपूर - लग्नासाठी सजून-धजून तयार झालेली नवरी रात्रभर नवरदेवाची प्रतीक्षा करत राहिली, पण वऱ्हाड आले नाही. कुटुंबीयांनी जेव्हा नवरदेवाच्या नातेवाइकांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ आढळला. शेवटी नवरीने स्वत:च नवरदेवाच्या मित्राला फोन केला तेव्हा उत्तर मिळाले- अब्रू वाचवायची असेल तर मी येतो, पण कोणतेही कारण नाही सांगितले.

 

(पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा लग्नाच्या तयारीपासून ते यापूर्वीच आर्य समाजमध्ये गुपचुप झालेल्या लग्नाचे PHOTOS)

 

असे आहे पूर्ण प्रकरण..
- पीडित तरुणी शोभा म्हणाली, कानपूरच्या गोपाल नगरमध्ये राहणारे गुलाबचंद्र वर्मा यांचा मुलगा प्रदीप वर्माशी 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी एकमेकांना भेटायचे.
- एवढेच नाही, दोघांनी 23 एप्रिल 2016 रोजी आर्य समाजात लग्नही केले. खूप दिवसांनंतर याची माहिती नातेवाइकांना मिळाली तेव्हा वरपक्षाकडील मंडळी नाराज झाली.
- यादरम्यान मी अनेक वेळा प्रदीपवर दबाव टाकला की, मला आपल्यासोबत घरी राहू दे, पण तोही बहाणे करू लागला.
- प्रदीपच्या वडिलांची ज्वेलरीची दुकान आहे. तेथे माझे वडील अनेक वेळा लग्नाची बोलणी करायला गेले, पण त्यांनाही अपमान करून हाकलण्यात आले.

पोलिसांत तक्रार दिल्यावर तयार झाले लग्नासाठी
- शोभ म्हणाली, आमच्याकडून लगातार प्रदीपच्या घरच्यांशी लग्नाची बोलणी सुरू होती, पण त्यांची नातेवाइकांनी 5 लाख रुपयांची डिमांड ठेवली होती.
- जेव्हा ते ऐकले नाहीत, तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावल्यावर प्रदीपच्या घरचे लग्नासाठी तयार झाले आणि 10 डिसेंबर 2017 रोजी लग्नाची तारीख फिक्स केली.
- या समझौत्यानंतर आमच्याकडून लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नपत्रिका छापल्या आणि मंगल कार्यालयही बुक करण्यात आले. परंतु मुलाकडचे वऱ्हाड घेऊन आलेच नाहीत.
- फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुलाकडच्या सर्वांचे मोबाइल स्विच ऑफ होते. प्रदीपच्या एका मित्राशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो म्हणाला- अब्रू वाचवायची असेल तर मी येतो!
- तरुणी म्हणाली, मी आता प्रदीपसह त्याच्या पूर्ण कुटुंबावर केस दाखल करणार आहे, त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- बिधनूचे पोलिस इन्स्पेक्टर राजेश वर्मा म्हणाले, आमच्या पोलिस स्टेशनमध्ये असे कोणतेही प्रकरण आलेले नाही. जर न्यू आझादनगर चौकीत आले असेल तर त्यांच्यात समझौता करण्यात आला असेल. आमच्याकडे काही तक्रार आली तर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...