आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीयूष व प्रसून पांडे यांना कान्स लायन्स जीवनगौरव पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- अॅड गुरू पीयूष पांडे आणि चित्रपट दिग्दर्शक प्रसून पांडे यांना कान्स लायन्स लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड (जीवनगौरव पुरस्कार), द लायन ऑफ सेंट मार्कने गौरवण्यात येणार आहे. ही घोषणा मंगळवारी कान्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीने केली. मूळचे जयपूरचे असलेले पीयूष पांडे दैनिक भास्कर समूहाचे स्वतंत्र संचालक आहेत. ते ओगिल्वी साऊथ एशियाचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन व क्रिएटिव्ह डायरेक्टरही आहेत. दोघेही हा सन्मान मिळवणारे आशियातील पहिल्याच व्यक्ती आहेत. पीयूष आणि प्रसून यांना हा पुरस्कार २२ जूनला होणाऱ्या कान्स फेस्टिव्हलमध्ये दिला जाईल. सेंट मार्क हा सर्वाेच्च सन्मान असून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर कम्युनिकेशन इंडस्ट्रीतील सृजनशील प्रतिभावंतांना कान्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीद्वारे प्रदान केला जातो. 


कान्स चित्रपट महोत्सवाचा हा ८ वा सेंट मार्क अॅवॉर्ड आहे. सन्मानाबद्दल पीयूष पांडे म्हणाले, ही माझ्यासाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे. मी भारतीयांच्या प्रती अत्यंत आभारी आहे. ही या देशाची समृद्धी आणि विविधता आहे, जिने मला व माझ्या भावाला चांगले काम शिकण्याची व सर्जनशीलतेची संधी मिळवून दिली. मी माझे सहकारी व ओगिल्वी यांचाही ऋणी आहे, ज्यांनी मला पाठिंबा व झेप घेण्याचे स्वातंत्र्य दिले. मी कान्सचे आभार मानू इच्छितो की त्यांनी भारतात आम्हाला इतर सर्जनीशल लोकांसाठी प्रेरणास्रोत होण्याची संधी दिली. 


विशेष म्हणजे, पीयूष हे २००४ मध्ये कान्स फेस्टिव्हलच्या ज्युरीचे अध्यक्ष राहिलेले अाहेत. असा मान मिळवणारे ते पहिलेच आशियाई आहेत. त्यांना २०१२ मध्ये सीएलआयओकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते २०१६ मध्ये पद्मश्री मिळवणारे जाहिरात व संवाद क्षेत्रातील पहिलेच व्यावसायिक आहेत. पीयूष यांनी पोलिओ निर्मूलनासाठी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेेक उल्लेखनीय अॅड कॅम्पेन डिझाइन केल्या. यासोबतच राष्ट्रीय साक्षरता अभियान, कॅडबरीज, ओनिडा, एशियन पेंट्स व फेव्हिकॉलसारख्या मोठ्या व संस्मरणीय जाहिराती केल्या. 

बातम्या आणखी आहेत...