आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद कॅप्टन कुंडूंनी फेसबुकवर म्हटले होते, ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरगाव- पाकच्या गोळीबारात शहीद झालेल्या कॅप्टन कपिल कुंडू यांचे फेसबुक स्टेटसवरील ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं’ हे वाक्य वाचल्यानंतर देशाबद्दलची त्यांची भावना कळू शकते. पटौदीजवळील रनसिका गावात साेमवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आई सुनीता म्हणाल्या, ‘माझा मुलगा नेहमी देशासाठी जगला. आणखी एक मुलगा राहिला असता तर त्यालाही सैन्यात पाठवले असते.’

 

घरातील एकुलता एक मुलगा
- कपिल यांना दोन बहीणी आहे. दोन बहीणींचे ते एकुलते एक भाऊ होते. त्यांच्या आईने टीव्ही चॅनलसोबत केलेल्या बातचीतमध्ये सांगितले की, कपिल यांचा 10 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्या निमित्ताने ते घरी येणार होते. बहिणींनी भावाचा शानदार वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. दोन्ही बहीणी भावाला रिसिव्हकरण्यासाठी स्टेशनवर जाणार होत्या. मात्र दैवाला काही वेगळेच मंजूर होते. ज्या भावाचा वाढदिवस साजरा करण्याचे आई-बहीणींनी ठरवेल त्याच्या वीरमरणाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. 

 

4 जवान शहीद 
- रविवारी पाकिस्तानच्या माऱ्यात गुडगावमधील रनसिका गावातील कॅप्टन कपिल कुंडू (23), ग्वाल्हेरचे रायफलमन राम अवतार (27), जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील हवलदार रोशनलाल (42) आणि जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रायफलमन शुभम सिंह (23) शहीद झाले आहेत. 
- हल्ल्यात आणखी दोन जण जखमी आहेत. 

पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल - राजनाथ सिंह 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध करत भेकड हल्ला म्हटले आहे. 
- ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या या हल्ल्याला आम्ही विसरणार नाही. हा पाकिस्तानचा मूर्खपणा ठरणार आहे आणि त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.'

 

'जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए' 
- कपिल यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर टॅगलाइन लिहिली होती, 'जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए'. हिंदी चित्रपट 'आनंद'मधील राजशे खन्ना यांचा हा डायलॉग आहे. 
- कॅप्टन कपिल यांचे आजोबा म्हणाले, 'माझा एकुलता एक नातू होता. आता मी काय करु. जो सहारा होता तोच निघून गेला. आता त्याच्या दोन बहीणी आहेत.'
- आई म्हणाली, 'त्याच्या देशभक्तीला सलाम करते. मला आणखी मुलं असते तर तेही देशासाठी कूर्बान केली असते.'

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, शवपेटीभाेवती विलाप करताना कुंडू यांचे कुटुंबीय.... 

बातम्या आणखी आहेत...