आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमधील चतरा जिल्ह्यात २ वैदूंकडून मुलाचे लिंग कापून हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चतरा - झारखंडमधील चतरा जिल्ह्यात दोन वैदूनी मंगळवारी एका नवजात शिशूचे लिंग कापले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हे कृत्य त्यांनी लिंगपरीक्षणातील खोटेपणा लपवण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. आदल्यादिवशी त्यांनी मुलगी होणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्या महिलेस मुलगा झाल्याने आपली बदनामी होईल, अशी भिती त्यांना वाटली. यासाठी त्यांनी मुलाचे लिंग कापले. रक्त जास्त वाहू लागल्याने मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा त्याचा मृतदेह या उलट्या काळजाच्या डॉक्टरांनी झाडीत फेकून दिला. दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे अारोग्यमंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांनी चतरा येथे शल्य चिकित्सकामार्फत या दोन वैदूवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजकुमार व अरुणकुमार हे झटखोरी गावात अवैधपणे क्लिनिक चालवत होते. सध्या ते फरार झाले आहेत. बलिया गावातील गुड्डी देवी या महिलेस  ८ महिन्याचा गर्भ हाेता. त्यांनी तिची सोनोग्राफी केली. तेव्हा गर्भात मुलगी असल्याचे सांगितले. पण मुलगा जन्मला आणि आपली बदनामी टाळण्यासाठी या वैदूनी नवजात शिशूचे लिंग कापले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...