आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बडोदा - प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सान्निध्यात आल्यानंतर राजयोगी म्हणून प्रसिद्ध झालेले कधीकाळी डाकू पंचम सिंह म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यावर तब्बल 100 मर्डरचा आरोप होता, सरकारने त्यांना पकडण्यासाठी 2 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर ते आता अध्यात्म मार्गावर चालत आहेत.
महिलांच्या छेडछाडीविरुद्ध कायदा नाही, जागृतीची गरज...
शनिवारी बडोद्याला आलेले राजयोगी म्हणाले की, आजकाल महिलांची होणारी छेडछाड आणि अत्याचाराच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी कायदा नाही, तर समाज जागृतीची जास्त गरज आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी द्वारा आयोजित कार्यक्रमात भाग घेत 96 वर्षीय राजयोगी म्हणाले की, कोणीही शौक म्हणून डाकू बनत नाही. परिस्थितीमुळे डाकू बनतो. जेव्हा मी 14 वर्षांचा होतो, तेव्हा छत्रीपुरा गावात पंचायत निवडणुका होत्या. आमच्या प्रतिस्पर्ध्याने मला आणि माझ्या वडिलांना खूप मारले. पोलिसांत तक्रार केली. मला तुरुंगावास झाला. जेलमधून सुटल्यावरही त्यांनी आमचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. मी त्रस्त झालो होतो. मग मी त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. मग काय, एका दिवशी चंबलच्या खोऱ्यात उतरलो आणि डाकूंच्या गँगमध्ये सामील झालो.
12 साथीदारांसह गावात येऊन केले 6 मर्डर
डाकूंच्या गँगमध्ये सामील होऊन मी आमच्या 12 साथीदारांसह गावात पोहोचलो आणि तेथे 6 जणांच्या हत्या केल्या. या घटनेनंतर माझे नाव आसपासच्या परिसरात झळकू लागले. एक काळ असा होता की, जेव्हा माझा दरारा 25 जिल्ह्यांपर्यंत पसरला होता. माझ्या नावाने लोकांचा थरकाप व्हायचा. त्या वेळी माझी एवढी दहशत होती की, जर एखाद्याने महिलेची छेड काढली, तर माझी माणसे त्याला जिवंत जाळत असत. संपूर्ण चंबल खोऱ्यात डाकू पंचमसिंहचीच दहशत होती. माझ्यावर सरकारने 2 कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते. परंतु माझ्याबाबत काही माहिती देण्याची कोणाचीच हिंमत नव्हती.
1972 मध्ये इंदिरा गांधींसमोर केले समर्पण
1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसेवक जयप्रकाश नारायण यांच्या माध्यमातून मला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मी यासाठी 8 अटी ठेवल्या. ज्यात कुणालाच फाशी देऊ नये, प्रत्येक डाकूला 30 बिघा जमीन, कुटुंबाला सर्व सुविधा आणि ओपन जेलमध्ये ठेवण्यासारख्या अटी होत्या. सरकारने त्यांच्या सर्व अटी मानल्या. कोर्टाने आम्हाला फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु जयप्रकाश नारायण यांच्या अर्जामुळे राष्ट्रपतींनी आमची फाशी शिक्षेत बदलली. आम्ही 8 वर्षे तुरुंगात राहिलो. जेव्हा आम्ही तुरुंगात होतो, तेव्हा प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक आम्हाला भेटायला आले. त्यांच्या प्रवचनांमुळे आम्ही प्रभावित झालो. मग आमचे जीवनच बदलून गेले. पूर्वीचा डाकू पंचम सिंह आता राजयोगी म्हणून ओळखला जात आहे. या आध्यात्मिक जीवनात मन नेहमी प्रफुल्लित राहते. मी आता येथेच रमलो आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.