आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने हुंड्यासाठी मुलगा बनून 2 मुलींशी केले लग्न, सेक्स टॉइज वापरून दिला 5 वर्षे धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हल्दवानी - एक तरुणीने मुलगा बनून दोन मुलींशी लग्न केले आणि त्यांच्याकडून बिझनेस करण्याच्या नावावर लाखो रुपये लुबाडले. 5 वर्षांनी खुलासा झाल्यावर बिजनौर धामपूरच्या कृष्णा ऊर्फ स्विटी सेनला पोलिसांनी अटक केली आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण... 
- कृष्णाने सन 2013 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून काठगोदाम येथील तरुणीला प्रेमजालात ओढले. 14 फेब्रुवारी 2014 रोजी दोघींचे लग्न झाले.

- कृष्णाने बिझनेस करायचा असल्याचे म्हणून सासरवाडीकडून 8.50 लाख रुपये घेतले. पत्नीचे दागिनेही विकले. लग्नानंतर तो पत्नीपासून दूरच राहत होता. 
- यामुळे दोघांमध्ये मारहाणही झाली आणि पत्नी माहेरी चालल्या गेली. यानंतर 2016 मध्ये कृष्णाने दुसरे लग्न केले.
- जेव्हा पहिली पत्नी काठगोदामला पोहोचली तेव्हा तिने दोन्ही कुटुंबांना मारण्याची धमकी दिली. यानंतर दोघेही गप्प बसले.  4 महिने तो दोन्ही पत्नींसोबत राहिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

सेक्स टॉइज वापरून दिला 5 वर्षे धोका

- कृष्णाला लहानपणापासूनच मुलांसारखे राहण्याचा शौक होता. त्यांच्याच सारखे कपडे घालणे आणि राहणे त्याला पसंत होते. 
- कृष्णाचा खरे नाव स्विटी सेना आहे. मतदान कार्ड, पॅन कार्ड व आधार कार्डावर कृष्णाने स्वत:ला कुठे पुरुष, तर कुठे स्त्री दाखवले आहे.

- कृष्णाने सेक्स टॉइजचा वापर करून दोन्ही पत्नींशी लैंगिक संबंध राखले होते. पण नंतर त्याचे/तिचे पितळ उघडे पडले.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...