आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने शेतकऱ्यांकडे नेहमीच मतपेढी म्हणून पाहिले : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालौत (पंजाब)- काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना कधीही प्रतिष्ठा दिली नाही, त्यांच्या सबलीकरणासाठी काहीही केले नाही. त्यांचा फक्त मतपेढी म्हणूनच वापर केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. आमच्या पक्षाने किमान आधारभूत दर (एमएसपी) दीडपट केल्याची घोषणा केल्यापासून काँग्रेस आणि त्याच्या सहकारी पक्षांची झोप उडाली आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 


पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील मालौत येथे शेतकरी कल्याण सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत दर देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर झाली आहे. 


आता पिकांसाठी जी गुंतवणूक केली आहे आणि जे श्रम केले आहेत त्याचे फळ मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे. काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत कधीही शेतकऱ्यांची चिंता केली नाही, त्या पक्षाने फक्त एका कुटुंबाचीच चिंता केली. काँग्रेसने शेतकऱ्यांना फक्त आपली मतपेढी समजले. त्या पक्षाच्या सरकारांनी शेतकऱ्यांना कधीही प्रतिष्ठा दिली नाही. त्यांच्या सबलीकरणासाठी कधीही पावले उचलली नाहीत. आमचे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास वचनबद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...