आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्‍याच्‍या मुलाने Fb live येत केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न, कापल्‍या दोन्‍ही हातांच्‍या नसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- युथ काँग्रेसचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष डिंपल राणांचा मुलगा युवराज याने गुरूवारी कॅनडामध्‍ये फेसबुक लाईव्‍ह येत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. त्‍याने आपले दोन्‍ही हातांच्‍या नसा कापल्‍या व या कृत्‍यासाठी आपले वडील जबाबदार असल्‍याचे सांगितले. फेसबुकवर हा व्हिडिओ येताच कॅनड्यातील वेंकुवर पोलिसांनी याची दखल घेतत युवराजचा शोध घेतला. व नंतर त्‍याला दवाखान्‍यात दाखल केले.

 

असे आहे प्रकरण
- युवराज दिड महिन्‍यापूर्वी कॅनडाला गेलेला आहे. गुरूवारी सकाळी त्‍याने मुड ऑफ असा स्‍टेटसय एफबीवर ठेवला. त्‍यानंतर पावणे तीन वाजता लाईव्‍ह येत आपल्‍या 24 मिनिटांच्‍या व्हिडिओमध्‍ये आपण आत्‍महत्‍या करत असल्‍याचे सांगितले.
- याच्‍या 7 मिनिटानंतरच तो पुन्‍हा फेसबुकवर लाइव्‍ह आला व आपल्‍या दोन्‍ही हाताच्‍या नसा कापल्‍या. दरम्‍यान हे दोन्‍ही व्हिडिओ संध्‍याकाळी फेसबुकवरून काढून टाकण्‍यात आले होते.
- पहिल्‍या व्हिडिओला जवळपास 2500 लोकांनी तर दुस-या व्हिडिओला 2000हून अधिक लोकांनी पाहिले. काहीजणांनी डिंपलचे वडील त्‍याची प्रत्‍येक मागणी पुर्ण करत असल्‍याचे सांगत त्‍याचे कृत्‍य  चुकीचे असल्‍याचे सांगितले आहे. तर त्‍याच्‍या मित्रांनी खर्चाच्‍या कारणामुळे त्‍याच्‍यात व वडिलांत तणाव होता. यामुळे त्‍याने आत्‍महत्‍या केली असे म्‍हटले आहे.

 

व्हिडिओमध्‍ये म्‍हणाला, वडीलांना शिक्षा मिळायला हवी
- आपण वडीलांमुळे त्रस्‍त झाल्‍यामुळे आत्‍महत्‍या करत आहोत, असे युवराजने व्हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे. तसेच या व्हिडिओला जास्‍तीत जास्‍त शेअर करा जेणेकरून वडिलांना शिक्षा मिळेल, असेही त्‍याने म्‍हटले आहे.

 

मुलाने असे का केले, माहित नाही- वडील
- 'माझे मुलासोबत कोणतेही भांडण नव्‍हते. राहिली गोष्‍ट त्‍याला रागवण्‍याची तर मुलाच्‍या चांगल्‍या भविष्‍यासाठी प्रत्‍येक आईबाप आपल्‍या मुलाला रागवत असतात. त्‍याने असे का केले, हे मला माहिती नाही', अशी प्रतिक्रिया युवराजच्‍या वडीलांनी घटनेनंतर दिली आहे.
- 'तो पुर्ण बरा झाल्‍यानंतर त्‍याने असे का केले व माझे नाव का घेतले, हे कळेल', असे युवराजचे वडिल म्‍हणाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, एफबी लाइव्‍ह दरम्‍यानचे फोटोज...
 


 

बातम्या आणखी आहेत...